VIDEO - सी-१७ ग्लोबमास्टरच्या लँडीगमधून भारताचा चीनला इशारा

By admin | Published: November 4, 2016 01:47 PM2016-11-04T13:47:38+5:302016-11-04T14:46:28+5:30

सी-१७ विमानाचे लँण्डीग ही भारतीय वायूदलासाठी महत्वाची कामगिरी आहे कारण मीचूका विमानतळ समुद्रसपाटीपासून ६,२०० मीटर उंचीवर आहे.

VIDEO - India warns China from the C-17 Globemaster landing | VIDEO - सी-१७ ग्लोबमास्टरच्या लँडीगमधून भारताचा चीनला इशारा

VIDEO - सी-१७ ग्लोबमास्टरच्या लँडीगमधून भारताचा चीनला इशारा

Next

 ऑनलाइन लोकमत 

 तवांग, दि. ४ - भारतीय वायूदलाने गुरुवारी सी-१७ ग्लोबमास्टर हे लष्करी मालवाहतूकीचे सर्वात मोठे विमान यशस्वीरित्या अरुणाचलप्रदेशच्या मीचूका विमानतळावर उतरविले. सी-१७ विमानाचे लँण्डीग ही भारतीय वायूदलासाठी महत्वाची कामगिरी आहे कारण मीचूका विमानतळ समुद्रसपाटीपासून ६,२०० फूट उंचीवर असून, भारत-चीन सीमेजवळील हा महत्वाचा तळ आहे. 
 
सी-१७ ग्लोबमास्टरच्या यशस्वी लँण्डीगमुळे आणीबाणीच्या प्रसंगात अरुणाचलप्रदेशमधील डोंगराळ, अतिदुर्गम भागातील मदतकार्याला वेग येणार आहे. या भागातील रस्तेमार्गाची स्थितीही फारशी चांगली नाही. चीनी सीमेजवळ असणारा मीचूका विमानतळ १९६२ च्या भारत-चीन युद्धात रणनितीकदृष्टया महत्वाचा ठरला होता. 
 
बराचकाळ हा विमानतळ वापराविना पडून होता. २०१३ मध्ये या विमानतळाच्या पूर्नबांधणीचा निर्णय घेण्यात आला. वायू दलाने ३० महिन्यांच्या रेकॉर्ड टाइममध्ये हा विमानतळ बांधून पूर्ण केला. हा विमानतळ इटानगरपासून ५०० किमी अंतरावर आहे. चीनी सीमेपासून हा विमानतळ फक्त २९ किमीवर आहे. 
 
भारतीय वायूदलाने २०१३ मध्येही असाच धाडसी प्रयोग केला होता. त्यावेळी वायू दलाने सी-१३० सुपर हरक्युल्स विमान जगातील सर्वात उंच दौलत बेग ओल्डीच्या धावपट्टीवर उतरवले होते. चीनसाठी तो एक इशारा होता. 
 
दौलत बेग ओल्डी सर्वात उंच विमानतळ 
दौलत बेग ओल्डी विमानतळ लडाखमध्ये आहे. जगातील हा सर्वात उंचावरील विमानतळ असून, भारतीय वायू दलाने २०१३ मध्ये जगातील या सर्वात उंच धावपट्टीवर सी-१३० सुपर हरक्युल्स हे विमान यशस्वीरित्या उतरवले होते. अमेरिकन बनावटीच्या या विमानाने ५० वर्षात प्रथमच इतक्या उंचावरील धावपट्टीवर लँडीग केले होते. १९६२ मध्ये भारत-चीन युध्दाच्यावेळी सर्वप्रथम इथे तळ बनवण्यात आला होता. 
 

Web Title: VIDEO - India warns China from the C-17 Globemaster landing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.