VIDEO : घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बॅट कमांडो आणि दहशतवाद्यांवर लष्कराचा ग्रेनेड हल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 10:57 AM2019-09-18T10:57:29+5:302019-09-18T10:58:15+5:30

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम 370 हटवल्यापासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना गती देण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत आहे.

VIDEO: Indian Army grenade attack on infiltrating Pakistani bat commandos and terrorists | VIDEO : घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बॅट कमांडो आणि दहशतवाद्यांवर लष्कराचा ग्रेनेड हल्ला  

VIDEO : घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बॅट कमांडो आणि दहशतवाद्यांवर लष्कराचा ग्रेनेड हल्ला  

Next

श्रीनगर - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम 370 हटवल्यापासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना गती देण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र सीमेवर सतर्क असलेले भारतीय लष्कराचे जवान पाकिस्तानकडून होणाऱ्या अशा कारवाया हाणून पाडत आहेत. दरम्यान, पाकिस्तानी घुसखोरांच्या घुसखोरीचा अजून एक व्हिडीओ समोर आला असून, 12 आणि 13 सप्टेंबरदरम्यानच्या या व्हिडीओत पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरीच प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. मात्र भारताच्या जवानांनी ग्रेनेड हल्ला करून  पाकिस्तानी बॅट कमांडो आणि दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. 



या व्हिडीओमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमच्या कमांडोंकडून घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. त्यादरम्यान, पाकिस्तानच्या सोशल सर्व्हिस ग्रुपचे कमांडो आणि दहशतवाद्यांवर भारतीय लष्कराने ग्रेनेडने हल्ला करून घुसखोरीचा डाव उधळून लावला. 



 यापूर्वी जम्मू काश्मीरमधील केरन विभागात लष्कराने पाकिस्तानी सैन्याचा घातपाताचा मोठा कट उधळून लावला होता. त्यावेळी लष्कराने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या बॅटच्या चार ते पाच घुसखोरांना ठार केले होते. 

 दरम्यान, 2019 मध्ये सुरुवातीच्या आठ महिन्यांमध्ये लष्कराने एकूण 139 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये नियंत्रण रेषेसह जम्मू काश्मीरमधील विविध भागात लष्कराशी झालेल्या चकमकींदरम्यान ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे. दरम्यान, या काळात काश्मीर खोऱ्यामध्ये विविध लष्करी कारवायांदरम्यान भारताच्या 26 जवानांना वीरमरण आले आहे. 

Web Title: VIDEO: Indian Army grenade attack on infiltrating Pakistani bat commandos and terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.