VIDEO - आयएनएस विक्रमादित्य ते माचू पिच्चूपर्यंत योगासने (फोटो स्टोरी)
By admin | Published: June 21, 2017 08:45 AM2017-06-21T08:45:08+5:302017-06-21T08:45:08+5:30
आज तिस-या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने देश-विदेशात योगासनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भारतात सर्वत्र योगदिन मोठया उत्साहात साजरा होत आहे.
ऑनलाइन लोकमत
आज तिस-या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने देश-विदेशात योगासनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भारतात सर्वत्र योगदिन मोठया उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्री, नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्री या योग कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. एरवी परस्परांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे राजकीय नेते योगदिनाच्या निमित्ताने एकत्र योगा करताना दिसत आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिनी २00 देशांमध्ये योगाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जगभरातील प्रतिसाद पाहता, योगविद्येच्या क्षेत्रातील भारताचे अधिपत्य साऱ्या जगाने मान्य केले आहे, असे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
योगाने संपूर्ण जगाला भारताबरोबर जोडले - पंतप्रधान मोदी
संयुक्त राष्ट्र महासभेने पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार, आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी २१ जूनचा दिवस निश्चित केला. पॅरिसला आयफेल टॉवरसमोरचे मैदान, लंडनला ट्रॅफलगर चौक, तर न्यूयॉर्कला सेंट्रल पार्क ही त्यातली काही प्रमुख ठिकाणे. जगभर मिळणारा प्रतिसाद पाहता, योगविद्येच्या क्षेत्रातील भारताचे अधिपत्य साऱ्या जगाने मान्य केले आहे, असे म्हटले, तर अतिशयोक्ती होणार नाही.
आयएनएस विक्रमादित्यवर योगासने करणारे नौसैनिक.
क्रोएशियात बास्का येथे समुद्र किना-यावर योगदिवस साजरा करण्यात आला.
पेरु माचू पिच्चू इथे तब्बल 2400 मीटर उंचीवर एकत्र येऊन योगा केला.
बंगालच्या सागरात आयएनएस जलाश्ववर नौसैनिकांनी योगदिवस साजरा केला.
दिल्लीत अमेरिकन दूतावासामध्ये योग दिवस साजरा करण्यात आला.
नायाब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत योगासने केली.
एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद, क्रीडा मंत्री विजय गोएल, भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी दिल्लीत योगासने केली.
अहमदाबादमध्ये आयोजित योगशिबिरांमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी,भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी एकत्र योगा केला.
राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य लखनऊमध्ये योगासने करताना.
मायनस 25 डिग्रीमध्ये 18 हजार फूट उंचीवर लडाखमध्ये योगासने करणारे आयटीबीपीचे जवान.
#WATCH ITBP jawans doing Yoga at nearly 18000 feet in Ladakh in -25 degrees #InternationalYogaDaypic.twitter.com/YvSGqpQnxF
— ANI (@ANI_news) June 21, 2017