Video: इस्त्रोचा बाहुबली मध्यरात्रीच अवकाशात झेपावला; 36 उपग्रह कवेत, पहिलेच व्यावसायिक उड्डाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 07:52 AM2022-10-23T07:52:29+5:302022-10-23T07:52:44+5:30
इस्त्रोच्या या रॉकेटने य़ापूर्वीही अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. या रॉकेटद्वारे आतापर्यंत चार प्रक्षेपण करण्यात आल्या आहेत.
इस्त्रोने आज मध्यरात्री एक नवा विक्रम केला आहे. एका खासगी कंपनीचे ३६ सॅटेलाईट्स घेऊन इस्त्रोचे LVM3 रॉकेट श्रीहरिकोटावरून लॉन्च झाले. वनवेब या कंपनीचे पुढील वर्षीच्या पहिल्या सहामाहीत आणखी ३६ सॅटेलाईट लाँच केले जाणार आहेत. आजचे हे लाँचिंग रात्री १२.०७ वाजता झाले.
वनवेबसोबत इस्त्रोची डील झाली आहे. यानुसार इस्त्रो या कंपनीचे दोनवेळा सॅटेलाईट पाठविणार आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये, वनवेबसाठी दुसरे लॉन्च देखील शक्य आहे. हे उपग्रह पृथ्वीच्या सर्वात खालच्या कक्षेत तैनात केले जाणार आहेत. हे OneWeb Leo नावाचे ब्रॉडबँड कम्युनिकेशन उपग्रह आहेत. LVM3 रॉकेटचे हे पहिले व्यावसायिक उड्डाण आहे.
#WATCH | ISRO launches LVM3-M2/OneWeb India-1 Mission from Satish Dhawan Space Centre (SDSC) SHAR, Sriharikota
— ANI (@ANI) October 22, 2022
(Source: ISRO) pic.twitter.com/eBcqKrsCXn
इस्त्रोच्या या रॉकेटने य़ापूर्वीही अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. 2019 मध्ये चांद्रयान-2, 2018 मध्ये GSAT-2, 2017 मध्ये GSAT-1 आणि त्यापूर्वी 2014 मध्ये क्रू मॉड्यूल अॅटमॉस्फेरिक री-एंट्री प्रयोग (CARE) या मोहिमांवर काम करण्यात आले होते. या रॉकेटद्वारे आतापर्यंत चार प्रक्षेपण करण्यात आल्या आहेत. या सर्व भारत सरकारच्या होत्या. या रॉकेटमध्ये खासगी कंपनीचा उपग्रह जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.