भयंकर! शिक्षकाने कॅमेऱ्यासमोरच कापली करंगळी; कारण ऐकून बसेल मोठा धक्का, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 05:16 PM2022-02-09T17:16:34+5:302022-02-09T17:18:01+5:30

शिक्षकाने थेट स्वत:ची करंगळी कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Video made my own finger cut video to explain that trees and animals should not be cut | भयंकर! शिक्षकाने कॅमेऱ्यासमोरच कापली करंगळी; कारण ऐकून बसेल मोठा धक्का, Video व्हायरल

भयंकर! शिक्षकाने कॅमेऱ्यासमोरच कापली करंगळी; कारण ऐकून बसेल मोठा धक्का, Video व्हायरल

googlenewsNext

नवी दिल्ली - प्राणी आणि झाडं कापल्यावर त्यांना किती वेदना होतात हे सांगण्यासाठी एका शिक्षकाने थेट स्वत:ची करंगळी कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झाडं आणि प्राण्यांना कापल्यानंतर त्यांना किती त्रास होतो, हे समजावण्यासाठी शिक्षकाने याचा एक व्हिडीओदेखील शूट केला आहे. शिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, लोकांना या वेदनेची जाणीव करून द्यायची आहे, ज्यामुळे ते जागरूक व्हावेत. ही घटना जवळपास एक महिना जुनी आहे. मात्र एक दिवसांपूर्वी याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूर शहरात ही घटना घडली आहे. येथे राहणारे तुलसीराम शर्मा कम्प्युटर इन्स्टीट्यूट चालवतात. तुलसीराम शर्मा यांनी सांगितलं की, 6 जानेवारी रोजी त्यांनी बोट कापल्याचा एक व्हिडीओ तयार केला होता. त्यांनी सांगितलं की, झाडं आणि प्राण्यांना मारू नये. हा संदेश देण्यासाठी त्यांनी आपली करंगळी कापली. त्यांचं म्हणणं आहे की, असं केल्याने तातडीने निकाल मिळेल आणि झाडं आणि प्राण्यांचा जीव घेणार नाहीत.

शर्माने सांगितलं की, त्यांनी कॉलनीत 700 झाडं लावली आहेत. यापैकी आता 300 झाडंच शिल्लक राहिले आहेत. याशिवाय यापूर्वी त्यांनी शेजारच्यांनाही इशारा दिला आहे की, जर त्यांनी झाडं कापली तर ते बोटं कापून टाकतील. लोकांना जागरूक करण्यासाठी ते आपल्या हातातील सर्व बोटं कापून टाकतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

तुलसीराम जोधपुरमध्ये 8 वर्षांपासून टेली इन्स्टीट्यूट चालवतात. त्यांची पत्नी लेक्चरर आहे आणि मुलगी अजमेरमध्ये इंजिनिअरिंग करीत आहे. शर्मा यांनी सांगितलं की, तोपर्यंत त्यांची बोट कापल्याचं त्यांच्या घरच्यांना माहिती नव्हतं. यादरम्याम त्यांच्या मुलीला शंका आली होती आणि तिने त्यांच्याशी बोलणं बंद केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 

Web Title: Video made my own finger cut video to explain that trees and animals should not be cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक