VIDEO: वंदे भारत ट्रेनमध्ये ओढली 'विडी'; सर्वत्र पसरला धूर, प्रवाशांनी काचा फोडून वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 03:12 PM2023-08-10T15:12:40+5:302023-08-10T15:13:39+5:30

या घटनेनंतर विना तिकीट ट्रेनमध्ये घुसून विडी ओढणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

VIDEO: man smoke cigarate in Vande Bharat train; Smoke spread everywhere, passengers saved their lives by breaking glass | VIDEO: वंदे भारत ट्रेनमध्ये ओढली 'विडी'; सर्वत्र पसरला धूर, प्रवाशांनी काचा फोडून वाचवला जीव

VIDEO: वंदे भारत ट्रेनमध्ये ओढली 'विडी'; सर्वत्र पसरला धूर, प्रवाशांनी काचा फोडून वाचवला जीव

googlenewsNext

Vande Bharat Train: काही महिन्यांपूर्वी भारतातील सर्वात आधुनिक 'वंदे भारत एक्स्प्रेस' सुरू झाली. रेल्वे विभागाकडून एक-एक करत या ट्रेन्सची संख्या वाढवली जात आहे. पण, ही ट्रेन सुरू झाल्यापासून ट्रेनबाबतीत कोणती ना कोणती घटना घडत आहे. कधी ट्रेनला जनावरे धडकत आहेत तर कधी दगड मारुन काचा फोडल्या जात आहेत. आता परत एकदा या ट्रेनमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी वंदे भारत ट्रेनच्या टॉयलेटमध्ये धुम्रपान करताना एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे. धुर्मपानामुळे ट्रेनमधील फायर अलार्म वाजला आणि एरोसोल अग्निशामक यंत्रणा सुरू झाली, यामुळे ट्रेनमध्ये सर्वत्र धूर पसरला. अधिकाऱ्यांनी तपास केला असता एक व्यक्ती विडी ओढत असल्याचे आढळून आले. ही घटना तिरुपती-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसमध्ये घडली. तो व्यक्ती ट्रेनच्या टॉयलेटमध्ये बसून विडी पीत होता.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ट्रेनच्या केबिनमध्ये सर्वत्र धूर दिसत असून प्रवाशांना ट्रेनमधून बाहेर काढले जात आहे. या घटनेमुळे रेल्वे सुमारे अर्धा तास थांबवावी लागली. ट्रेनमध्ये धूर पसरल्यामुळे ट्रेनला आग लागल्याचे वाटून प्रवाशांनी ट्रेनच्या काचा फोडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेनंतर आरोपी प्रवाशाला नेल्लोर येथे रेल्वे पोलीस दलाने ताब्यात घेतले असून त्याच्यावर रेल्वे कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. विशेष म्हणजे तो आरोपी विना तिकीट प्रवास करत होता. 

Web Title: VIDEO: man smoke cigarate in Vande Bharat train; Smoke spread everywhere, passengers saved their lives by breaking glass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.