VIDEO: बाकावर बसून न्यूज पेपर वाचता-वाचता आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 07:43 PM2022-11-06T19:43:06+5:302022-11-06T19:47:09+5:30
सीसीटीव्हीत एक घटना कैद झाली आहे, ज्यात एक व्यक्ती बाकावर बसून वर्तमानपत्र वाचत असताना त्याला हृदयविकाराचा झटका येतो.
बारमेर:राजस्थानमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती बाकावर बसून वर्तमानपत्र वाचत होता, तेवढ्यात त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तिथे उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. टीव्ही-9 हिंदीने याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.
ही घटना बारमेर जिल्ह्यातील पाचपदरा येथील आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बेंचवर बसून वर्तमानपत्र वाचत असल्याचे दिसत आहे. पण यावेळी अचानक त्याला हृदयविकाराचा झटका येतो. यामुळे तो खाली कोसळतो आणि त्याचा जागीच मृत्यू होतो. यावेळी तिथे उपस्थित लोक त्या व्यक्तीच्या जवळ येऊन त्याला पाहतात. ही संपूर्ण घटना त्या ऑफिसमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
राजस्थान के बाडमेर में एक वीडियो वायरल हो रहा है, जिसमें एक युवक बेंच पर बैठकर अखबार पढ़ रहा है. लेकिन देखते ही देखते उसे हार्टअटैक आ जाता है और उसकी मौत हो जाती है.#Rajasthan#heartattackpic.twitter.com/kKTotOwMZs
— Mayank Tiwari (@imayanktiwari) November 6, 2022
अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ
कोरोना महामारीनंतर देशभरात हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. फक्त वृद्धच नाही तर तरुण वर्ग या आजाराला बळी पडत आहेत. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यात व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका येऊन, त्याचा जागीच मृत्यू होतो. अलीकडेच दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयातील तज्ज्ञांनी एक अभ्यास केला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, आर्टरीचा डायमीटर नाही, तर लहान बॉडी सर्फेस असल्यामुळे हार्ट अटॅक होत आहेत.
सर्वेक्षणात 250 लोकांचा सहभाग
या सर्वेक्षण अहवालात सुमारे 250 लोकांचा समावेश करण्यात आला होता, त्यापैकी 51 टक्के रुग्ण उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते, 18 टक्के रुग्णांना मधुमेह आणि 4 टक्के लोक धूम्रपान करत होते, तर 28 टक्के रुग्णांना डिस्लीपिडेमिक होते. तसेच, 26 टक्के रुग्ण असे होते की त्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास होता.