व्हिडिओ : विधानसभेत टेबलवर उभे राहून भाजपच्या आमदाराचा गोंधळ
By Admin | Published: June 10, 2016 09:17 PM2016-06-10T21:17:09+5:302016-06-10T21:21:32+5:30
विधानसभेत टँकर घोटाळ्यावरून वाद सुरू असताना विजेंद्रर गुप्ता हे थेट टेबलवर उभे राहून बोलत होते
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० : दिल्ली विधानसभेत आज (शुक्रवारी) जोरदार गोंधळ बघायला मिळाला. भाजपचे आमदार विजेंदर गुप्ता यांनी त्यांचं म्हणनं मांडू न दिल्याचा आरोप सभापतींवर लावला. विधानसभेत टँकर घोटाळ्यावरून वाद सुरू असताना विजेंद्रर गुप्ता हे थेट टेबलवर उभे राहून बोलत होते. गुप्तांच्या या वर्तनावर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हसताना दिसले.
झालेल्या प्रकारावर दिल्ली विधानसभेचे सभापती रामनिवास गोयल म्हणाले की, आतापर्यंत कुणीही आमदार किंवा खासदार अशाप्रकारे टेबलवर उभा राहिलेला नाहीये. तुम्ही सर्व वेळ हायजॅक करता. अशाप्रकारे टेबलवर उभे राहणे संसदीय परंपरेचा अपमान आहे.
आमदार गुप्ता यांचा आरोप आहे की, सभापतींनी त्यांना बोलू दिलं नाही, त्यामुळे त्यांनी असं केलं. पण या घटनेमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. यादरम्यान, अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी आमदाराना सर्वच कागदपत्रे देण्यात तयार आहे. मी उद्या जलबोर्डाचा अहवाल देणार. तुमच्या पत्नीने जो पेंशन घोटाळा केलाय त्याचा अहवाल तुम्ही आम्हाला द्या.
WATCH: BJP's Vijender Gupta stand on a bench to protest against Delhi Govt inside State Assemblyhttps://t.co/fY9FQyEzI0
— ANI (@ANI_news) June 10, 2016