VIDEO - मायकल क्लार्क जेव्हा भारतात रिक्षा चालवतो

By admin | Published: March 2, 2017 01:38 PM2017-03-02T13:38:17+5:302017-03-02T13:42:49+5:30

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क भारतातील रस्त्यावर रिक्षा चालवताना दिसला

VIDEO - Michael Clarke runs autorickshaws in India | VIDEO - मायकल क्लार्क जेव्हा भारतात रिक्षा चालवतो

VIDEO - मायकल क्लार्क जेव्हा भारतात रिक्षा चालवतो

Next

ऑनलाइन लोकमत
बंगळूरू, दि. 2 - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क भारतातील रस्त्यावर रिक्षा चालवताना दिसला आहे. काल त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये मायकल क्लार्क रिक्षा चालवायचे शिकत असल्याचे दिसतं. पुणे येथे झालेल्या पहिल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान क्लार्क कॉमेंट्री करताना दिसला होता. दुसरा सामना चार मार्च रोजी बंगळूरुत येथे होणार आहे. दोन्ही संघ येथे दाखल झाले आहेत.

सोशल मीडियावर क्लार्कने पोस्ट केलेला व्हिडिओ चाहत्यांना आवडला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती क्लार्कला रिक्षा कशी चालवायची सांगत आहे, त्याच्या माहितीनंतर क्लार्क बंगळूरुच्या रस्त्यावर रिक्षा घेऊन गेल्याचे दिसतं आहे.

रिक्षा चालवायचे शिकत आहे, ज्या शहरातून माझ्या क्रिकेट करिअरची सुरुवात झाली त्या शहरात परत आल्याचा आनंद झाला आहे. असे त्या व्हिडिओ खाली क्लार्कने लिहले आहे.

दरम्यान, 2004 मध्ये बंगळूरुमधून मायकल क्लार्कने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शतक भारताविरुद्ध शतक ठोकले होते.

 

Web Title: VIDEO - Michael Clarke runs autorickshaws in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.