VIDEO: मंत्री महोदयांचा सुरक्षारक्षकाला चपलेचे बक्कल लावण्याचा आदेश
By Admin | Published: August 16, 2016 11:35 AM2016-08-16T11:35:47+5:302016-08-16T12:37:59+5:30
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात झेंडावदन करण्यासाठी पोहोचलेल्या मंत्री महोदयांनी चपलांचे बक्कल लावण्यासाठी वैयक्तिक सुरक्षा रक्षकाला आदेश दिल्याने त्यांच्यावर टीका होत आहे
- ऑनलाइन लोकमत
भुवनेश्वर, दि. 16 - स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात झेंडावदन करण्यासाठी पोहोचलेल्या मंत्री महोदयांनी चपलांचे बक्कल लावण्यासाठी वैयक्तिक सुरक्षा रक्षकाला आदेश दिल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. ओदिशाचे मंत्री योगेंद्र बेहरा केंदुझार येथे झेंडावंदनासाठी पोहोचले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी आपल्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकाला हा आदेश दिला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
विशेष म्हणजे आपल्या या कृत्याबद्दल खेद व्यक्त करण्याऐवजी योगेंद्र बेहरा यांनी समर्थनच केलं आहे. 'मी व्हीआयपी आहे', असं सांगत त्यांनी आपण केलं ते योग्य केलं असल्याचं म्हटलं आहे.
#WATCH: Odisha Minister Yogendra Behera makes PSO tie his sandal straps in public in Kendujhar, says 'I am a VIP'https://t.co/yB0ZUslWxt
— ANI (@ANI_news) August 16, 2016
व्हिडिओमध्ये योगेंद्र बेहरा यांचा सुरक्षा अधिकारी खाली वाकून बेहरा यांच्या सँडल्सचे बक्कल लावताना दिसत आहे. एखाद्या राजकारणी व्यक्तीने हे असे लाजिरवाणे कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही पश्चिम बंगालचे मंत्री राचपाल सिंग यांनी पोलिस अधिकाऱ्याला शूलेस बांधायला लावल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार टीका करत माणुसकीचा अपमान असल्याचं बोलले होते.
I am a VIP. I've hoisted the flag here; he (PSO) has done that (tied the sandal strap): Odisha Min. Yogendra Behera pic.twitter.com/elrldh7NlJ
— ANI (@ANI_news) August 16, 2016