Video : आमदार राजासिंगनं केला कंटेनरचा पाठलाग, हैदराबादेत गायींच्या तस्करीचा पर्दाफाश 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 05:47 PM2019-01-28T17:47:39+5:302019-01-28T17:51:25+5:30

तेंलगणातील भाजपाचे एकमेव आमदार टी राजसिंग हे गोशामहल मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

Video: MLA Rajasinan used to pursue container, busted cows trafficking in Hyderabad | Video : आमदार राजासिंगनं केला कंटेनरचा पाठलाग, हैदराबादेत गायींच्या तस्करीचा पर्दाफाश 

Video : आमदार राजासिंगनं केला कंटेनरचा पाठलाग, हैदराबादेत गायींच्या तस्करीचा पर्दाफाश 

Next

हैदराबाद - तेंलगणातील भाजपाचे एकमेव आमदार टी राजासिंग यांनी स्वत: गायींनं भरलेला ट्रक पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. येथील शमीरपेठ पोलिस हद्दीत गायींनी भरलेल्या एका कंटनरच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार होत असल्याची माहिती आमदार राजासिंग यांना मिळाली. त्यानंतर, तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन राजासिंग यांनी घटनास्थळावर धाव घेतली. चक्क कंटेनरवर चढून राजासिंग यांनी गायींची विक्री करणाऱ्यांना उघडं पाडलं. 

तेंलगणातील भाजपाचे एकमेव आमदार टी राजसिंग हे गोशामहल मतदारसंघातून विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपने तेलंगणात लढवलेल्या 119 जागांपैकी केवळ एक जागा भाजपाला जिंकता आली होती. त्या एका जागेवर राजासिंग यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपामध्ये त्यांच्या मताला मोठी किंमत आहे. आपल्या कट्टर हिंदुत्ववादी बाण्यामुळे टी राजासिंग ओळखले जातात. तर, श्रीराम संघटनेचं संस्थापक असलेले राजासिंग हे हैदराबादेत औवेसी बंधुंना टक्कर देणार हिंदू नेता म्हणूनही त्यांची हैदराबादमध्ये ओळख आहे. गोमाता हा राजासिंग यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळेच, गायींची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच, स्वत: राजासिंग यांनी शमीरपेठ गाठत गायींची सुटका केली. त्यानंतर, गायींची तस्करी करणाऱ्या ड्रायव्हरविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली. शेरीलिंगमपल्ली येथे रस्त्यावरच ट्रकला गाठून राजासिंग यांनी गायींची सुटका केली. राजासिंग यांनी आपल्या फेसबुकवरुन याबाबत माहिती दिली. तसेच जय गो माता... असेही सिंग यांनी लिहलं आहे.

पाहा, व्हिडीओ -

Web Title: Video: MLA Rajasinan used to pursue container, busted cows trafficking in Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.