VIDEO - भर सभागृहात आमदारांनी विधानसभाध्यक्षांचे शर्ट फाडले
By admin | Published: February 18, 2017 01:43 PM2017-02-18T13:43:58+5:302017-02-18T13:43:58+5:30
तामिळनाडू विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच गदारोळ कायम राहिल्याने दुपारी तीन वाजेपर्यंत पुऩ्हा एकदा सभागृह तहकूब करण्यात आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 18 - तामिळनाडू विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच गदारोळ कायम राहिल्याने दुपारी तीन वाजेपर्यंत पुऩ्हा एकदा सभागृह तहकूब करण्यात आले आहे. गुप्तमतदानाची मागणी फेटाळल्यानंतर तामिळनाडू विधानसभेमध्ये द्रमुक आमदारांनी केलेल्या तोडफोडीनंतर एकच्या सुमारास पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात झाली होती.
तामिळनाडू विधानसभाध्यक्ष पी.धनापाल यांनी सभागृहात जे घडले त्याबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी विधानसभेतील पोलिसांना द्रमुक आमदारांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर द्रमुक आमदार विधानसभेच्या आत धरणे आंदोलनाला बसले.
द्रमुक आमदारांनी माझे शर्ट फाडले. माझा अपमान केला. कायद्यानुसार मी माझे काम करत होतो असे धनपाल यांनी सांगितले. द्रमुक, पनीरसेल्वम गटाची गुप्तमतदानाची मागणी फेटाळल्यानंतर द्रमुक आमदार आक्रमक झाले. त्यांनी आसनांवर उभे राहून घोषणाबाजी केली. खुर्च्या, टेबलांची मोडतोड केली.
#WATCH DMK MLAs scuffle with TN Assembly speaker, protesting DMK MLA Ku Ka Selvam sat on speaker chair #floortest (Jaya TV) pic.twitter.com/CkMQY9FfQx
— ANI (@ANI_news) February 18, 2017