VIDEO: ओवेसींच्या घराबाहेर फडकवला भगवा, दिले ‘भारत माता की जय’चे नारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 22:28 IST2017-12-25T22:25:32+5:302017-12-25T22:28:37+5:30
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घराबाहेर काही तरुणांनी भगवा फडकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

VIDEO: ओवेसींच्या घराबाहेर फडकवला भगवा, दिले ‘भारत माता की जय’चे नारे
मुंबई: एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घराबाहेर काही तरुणांनी भगवा फडकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तरुण भगवा झेंडा हातात घेऊन ‘वंदे मारतम’ आणि ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
केवळ घोषणाबाजी आणि भगवा फडकावून हे तरूण थांबले नाहीत, तर ओवेसी यांच्या घराबाहेर एक पोस्टरही लावण्यात आलं आहे. या पोस्टरवर , ‘भगवा ए हिंद।’, असे शब्द लिहिलेले आहेत. ओवेसी यांच्या घराबाहेर घोषणाबाजी करणारे हे तरूण राष्ट्र स्वाभिमान दलाचे असल्याचे म्हटले जाते आहे. विशेष म्हणजे ओवेसी व्हीआयपी श्रेणीत असून देखील त्यांच्या घरासमोर गोंधळ सुरू असताना कोणत्याही सुरक्षा रक्षकाने अथवा पोलिसांनी गोंधळ घालणा-या तरूणांना रोखलं नाही. देश सुरुवातीपासून भगवा होता आणि भगवाच राहिल असं वक्तव्य हे तरूण करत आहेत.
काही दिवसांपूर्वी ओवेसी यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये त्यांनी , जेव्हा आम्ही हिरवा रंग परिधान करु तेव्हा सगळं हिरवं करु. तेव्हा आमच्या हिरव्या रंगासमोर कुठलाही रंग टिकणार नाही. आमच्या रंगासमोर मोदींचा किंवा काँग्रेसचा कुणाचाही रंग टिकणार नाही.असं वक्तव्य केलं होतं.
पाहा व्हिडीओ -