Video - स्मार्टफोन दुरुस्त करण्यासाठी घेऊन गेला पण हात लावताच बॉम्बसारखा फुटला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 08:12 PM2022-10-24T20:12:46+5:302022-10-24T20:18:31+5:30
एका व्यक्तीने त्याचा स्मार्टफोन दुकानात दुरुस्तीसाठी आणला होता. दुकानदार स्मार्टफोनवर काम करत असताना अचानक तो बॉम्बसारखा फुटला.
उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील स्मार्टफोन दुरुस्तीच्या दुकानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. स्मार्टफोन स्फोटाच्या घटनेत एक ग्राहक आणि दुकानदार थोडक्यात वाचल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीने त्याचा स्मार्टफोन दुकानात दुरुस्तीसाठी आणला होता. दुकानदार स्मार्टफोनवर काम करत असताना अचानक तो बॉम्बसारखा फुटला. पाली परिसरात ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
भदोही वाला नावाच्या ट्विटर युजरने या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. उत्तर प्रदेशातील ललितपूरमध्ये दुरुस्तीदरम्यान स्मार्टफोनचा बॉम्बसारखा स्फोट झाला असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. 13 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की दुकानदाराने फोनमधून बॅटरी काढताच मोबाईल फुटला आणि त्याला आग लागली. काउंटरवर उभा असलेला दुकानदार आणि एक ग्राहक लगेचच मागे गेले त्यामुळे ते स्फोटातून बचावले.
ललितपुर में रिपेयरिंग के दौरान मोबाइल में धमका हो गया. बाल बाल बचे दुकानदार और ग्राहक. pic.twitter.com/WSghtQnt9L
— Vishal Kaushik🇸🇴 (@ivishalkaushik) October 23, 2022
या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी फुटेज अत्यंत भयंकर आहे. कारण काही सेकंद उशीर झाला असता तर दुकानदाराला गंभीर दुखापत झाली असती. पाली पोलीस स्टेशनचे शहर प्रभारी सियाराम सिंह पटेल यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून तपास सुरू केला असल्याचं म्हटलं आहे.
लोकांना हा व्हिडीओ पाहून मोठा धक्का बसला आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ आतापर्यंत 15000 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. ही घटना लक्षात घेऊन, बॅटरी चार्ज करताना आपला मोबाईल कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणापासून सुरक्षित अंतरावर ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"