Video: नादच खुळा; ताशी ९०० किमीचा वेग,3 फायटर विमानांनी अवकाशात बनवलं त्रिशुळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 12:51 PM2024-01-26T12:51:06+5:302024-01-26T13:13:56+5:30
राजपथावरील यंदाचा परेड सोहळ्याचा हा कार्यक्रम दीड तांसाचा असून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - देशभरात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राजधानी दिल्लीतील राजपथावरही यंदा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं. 'विकसित भारत' आणि 'भारत-लोकतंत्र की मातृका' या थीमवर आधारित यंदाचा परेडसोहळा झाला. या परेडमध्ये १३,००० प्रमुख पाहुणे सहभागी झाले होते. तर, यंदा प्रथमच समाजातील सर्वच वर्गातील नागरिकांना प्रातिनिधीक स्वरुपात राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भाग घेता आला.
राजपथावरील यंदाचा परेड सोहळ्याचा हा कार्यक्रम दीड तांसाचा असून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तब्बल १४,००० जवान प्रमुख पाहुणे व नागरिकांच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून उभे आहेत. राजपथावर देशातील विविध राज्यांच्या सांस्कृतिकतेचं दर्शन घडवणाऱ्या चित्ररथांचे प्रदर्शन झाले. या चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उत्तर प्रदेश सरकारने रामललाचे दर्शन घडवले, तर महाराष्ट्र सरकारने बाल शिवाजीचे रुप साकारल्याचं पाहायला मिळालं. यासह, सैन्य दलाच्या कवायती आणि परेड पाहून टाळ्यांचा कडकडाट झाला. यामध्ये राजपथावर बुलेट व दुचाकी वाहनावरुन जवानांनी डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कसरती करुन दाखवल्या. त्यासोबतच, वायूसेनेच्या हवाई कसरतींनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यामध्ये, फायटर विमानांनी तब्बल ९०० किमी प्रतितास या वेगाने केलेल्या कसरती डोळ्यात साठवणाऱ्या होत्या.
कर्तव्य पथावरील अवकाशात भारतीय वायूसेनेच्या जवानांनी चित्तथरारक कसरती करुन दाखवल्या. यावेळी, भारताच्या सहा राफेल फायटर जेटने वजरंग आसनातील कसरत हवेत करुन दाखवली. तर, सुखोई ३० एमके विमानांनी ९०० किमी प्रति तासाच्या वेगाने हवेत कसरती केल्या. यावेळी, त्यांनी तीन विमान एकत्रित करुन त्रिशुळ ही संकल्पना सादर केली होती. यावेळी, कर्तव्य पथावरील नागरिकांना टाळ्या वाजवून दाद दिली.
#WATCH | Three Su-30 Mk-I aircraft make Trishul formation at 900 kmph over water channel north of Kartavya Path along with the IAF Marching contingent, during #RepublicDay2024 celebrations. pic.twitter.com/pDa4M6YS0e
— ANI (@ANI) January 26, 2024
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते राजपथावर झेंडा फडकवल्यानतंर देशभरातील सर्वच ठिकाणी ध्वजारोहण झाले. राजपथावर यंदा दैदिप्यमान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मूंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मैक्रों यांच्यासह दिगग्जांची उपस्थिती होती. राजपथावरील यंदाच्या परेममध्ये वेगळेपण दिसून आलं. दरवर्षी सैन्याचा बँड वाजवून परेडला सुरुवात केली जाते. मात्र, यंदा नवी सुरुवात पाहायला मिळाली. देशभरातील १०० महिलांनी सांस्कृतिक पारंपरिक वाद्य वाजवून परेडला सुरुवात केली. तसेच, शंखनादही झाला.