Nitish Kumar : "आता इकडे-तिकडे जाणार नाही..."; नितीश कुमारांचं आश्वासन ऐकताच मोदींना आवरलं नाही हसू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 04:19 PM2024-03-02T16:19:57+5:302024-03-02T16:27:27+5:30
Nitish Kumar And Narendra Modi : नितीश कुमार आपल्या भाषणात असं काही बोलले की पंतप्रधान जोरजोरात हसायला लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारच्या औरंगाबादमध्ये आहेत. त्यांनी अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यावेळी व्यासपीठावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते. नितीश कुमार आपल्या भाषणात असं काही बोलले की पंतप्रधान जोरजोरात हसायला लागले. नितीश कुमार म्हणाले, "तुम्ही याआधीही इथे आलात पण आम्ही गायब झालो, पण आता आम्ही पुन्हा इकडे-तिकडे जाणार नाही, असं आश्वासन देतो"
जेव्हा नितीश कुमार यांनी पीएम मोदींना खूप काम सुरू आहे, ते लवकर पूर्ण करेन असं म्हटल्यावर मोदी हसायला लागले. नितीश पुन्हा हसले आणि म्हणाले, "तुम्ही इथे आलात याचा आम्हाला खूप आनंद आहे, तुम्ही आधी आला होता आणि इथे आम्ही गायब झालो होतो. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आता आम्ही इकडे तिकडे जाणार नाही. आम्ही फक्त तुमच्यासोबत राहू."
"2005 पासून बिहारमध्ये सर्व काम आम्ही एकत्र केली"
नितीश कुमार यांनी अलीकडेच महाआघाडीशी संबंध तोडून भाजपासोबत सरकार स्थापन केलं आहे. त्यांनी एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पीएम मोदींचा बिहार दौरा खूप दिवसांपासून ठरला होता. नितीश कुमार म्हणाले की, "आम्ही 2005 पासून एकत्र आहोत. आम्ही सतत किती काम केले याची मोजदाद करत आहोत. याआधी एकही काम झाले नाही, कोणी अभ्यास करत नव्हतं, मात्र आम्ही एकत्र येऊन 2005 पासून सर्व काम केली आहेत"
"मोदी बिहारमध्ये येतच राहतील, मला पूर्ण विश्वास आहे"
मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, "बिहार पुढे जावो ही आमची इच्छा आहे. तुम्ही राज्यासाठी काम करत आहात, प्रत्येक व्यक्तीचे कल्याण व्हावे आणि सर्वांनी पुढे जावे." नितीश हसत हसत म्हणाले, "मला खूप आनंद झाला आहे की आज पंतप्रधान आले आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मोदीजी बिहारमध्ये येतच राहतील." नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींच्या 'अबकी बार 400 पार ' या घोषणेचा पुनरुच्चार केला. यावेळी तुम्ही किमान 400 जागा जिंकाल असा आम्हाला विश्वास आहे असं देखील म्हटलं.