VIDEO: जाम भारी! ना हिंदी ना इंग्रजी; चक्क संस्कृतमधून क्रिकेट कॉमन्ट्री, व्हिडिओ पाहाच...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 04:26 PM2022-10-04T16:26:48+5:302022-10-04T16:28:39+5:30
कॉमेन्ट्रीशिवाय क्रिकेट सामना अपूर्ण आहे. सध्या एका कॉमेन्ट्रीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
नवी दिल्ली: क्रिकेट हा भारतातील लोकप्रिय खेळ आहे. गल्लो-गल्लीमध्ये तुम्हाला क्रिकेट खेळताना दिसून येईल. या गल्ली क्रिकेटमधूनच देशाला अनेक महान खेळाडून मिळाले आहेत. कधी-कधी या गल्ली क्रिकेटमधील सामने आणि तिथे होणारी कॉमेन्ट्री चर्चेचा विषय ठरते. अशीच एक कॉमेन्ट्री सध्या चर्चेत आली आहे.
Sanskrit and cricket pic.twitter.com/5fWmk9ZMZy
— lakshmi narayana B.S (@chidsamskritam) October 2, 2022
सोशल मीडियावर सध्या एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही मुले क्रिकेट खेळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, यावेळी तेथे उपस्थित मुले एकमेकांशी चक्क संस्कृतमध्ये एकमेकांशी बोलताना आणि कॉमेन्ट्री करताना दिसले. ट्विटर यूजर लक्ष्मी नारायण बीएस यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून, पोस्टला 'संस्कृत आणि क्रिकेट' असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.
भारतातील संस्कृत भाषिक
2011 च्या जनगणनेतून मिळालेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, भारतीय लोकसंख्येपैकी 0.002 टक्के पेक्षा कमी लोक संस्कृत बोलतात. संस्कृत ही भारतातील केवळ 24,821 लोकांची मातृभाषा आहे. 2001 च्या जनगणनेत ही संख्या 14,135 होती. संस्कृत बोलणाऱ्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आरटीआय अर्जाच्या उत्तरात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.