व्हिडिओ : नुसरत जहाँने लोकसभा अध्यक्षांचा घेतला आशीर्वाद ; नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 14:14 IST2019-06-26T14:13:41+5:302019-06-26T14:14:02+5:30
लग्नामुळे खासदारकीच्या शपथविधी सोहळ्याला नूसरतला उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे तिचा शपथविधी उशीरा झाला.

व्हिडिओ : नुसरत जहाँने लोकसभा अध्यक्षांचा घेतला आशीर्वाद ; नेटकरी म्हणाले...
नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसची नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँने नुकतीच खासदारकीची शपथ घेतली. नुसरतचे नुकतेच लग्न झाले आहे. त्यामुळे खासदारकीच्या शपथविधी सोहळ्याला तिला उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे तिचा शपथविधी उशीरा झाला. परंतु, शपथ घेण्यापेक्षा आपल्या वेगळेपणामुळे नुसरत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नुसरतने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या पायावर डोक ठेवून आशीर्वाद घेतला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने म्हटले की, 'वाह काय संस्कार आहेत'. तर एका युजरने लिहिले की, हा आजचा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे. तर दुसऱ्याने म्हटले की, नुसरतने शपथ घेतल्यानंतर 'वंदे मातरम' म्हटले आणि लोकसभा अध्यक्षांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे माझ्या नजरेत नुसरतविषयीचा आदर आणखी वाढला आहे.
#WATCH: TMC's winning candidate from Basirhat (West Bengal), Nusrat Jahan takes oath as a member of Lok Sabha today. pic.twitter.com/zuM17qceOB
— ANI (@ANI) June 25, 2019
एका यूजरने म्हटले की, नुसरतचा अंदाज चांगला होता. मी मुस्लीम असून नुसरतला माझा पाठिंबा आहे. ती भारताची संस्कृती पुढे चालवत आहे. हिंदुस्थान जिंदाबाद.