'अब तो होश ना खबर है....', आमदार गोपाल मंडलांचा डान्स व्हिडिओ व्हायरल, पुन्हा चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 02:30 PM2022-05-04T14:30:55+5:302022-05-04T14:43:21+5:30
Gopal Mandal : नेहा कक्कडने गायिलेल्या 'अब तो होश ना खबर है, तुझसे मिलने के बाद दिलबर' या गाण्यावर आमदार गोपाल मंडल हे डान्स करताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत.
बिहारमधील जनता दल युनायटेडचे आमदार गोपाल मंडल सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्यांची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. यावेळी गोपाळ मंडल आपल्या विधानाने नाही, तर एका लग्न समारंभात बॉलिवूड गाण्यावर थिरकल्याने चर्चेत आले आहेत. बॉलिवूड गाण्यावर डान्स केलेला त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कडने गायिलेल्या 'अब तो होश ना खबर है, तुझसे मिलने के बाद दिलबर' या गाण्यावर आमदार गोपाल मंडल हे डान्स करताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत. सफेद कुर्ता आणि पायजामा परिधान केलेले आमदार गोपाल मंडल हे आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभात उपस्थित असल्याचे व्हिडिओवरून दिसून येते.
डान्स फ्लोअरवर मुलांसोबत थिरकले
आजकाल लग्नात डीजे लावला जातो. अशाच प्रकारे आमदार गोपाल मंडल उपस्थित असलेल्या लग्नात डीजे लावण्यात आला होता. यावेळी डीजेच्या तालावर थिरकण्याचा मोह आमदार गोपाल मंडल यांना आवरता आला नाही. त्यांनी डान्स फ्लोअरवर मुलांसोबत बॉलिवूड गाण्यावर डान्स केला. दरम्यान, आमदार गोपाल मंडल डान्स करत असताना त्यांचा कोणीतरी व्हिडिओ तयार केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कुर्ता डांस के बाद अब देखिए ट्रैफिक डांस! विधायक गोपाल मंडल को अक्सर सुर्खियों में रहते हैं.इसके पहले भी उन्होंने कुर्ता डांस किया है.इस बार अंदाज बदला है और बन गए हैं ट्रैफिक पुलिस.देखें कैसे नेहा कक्कड़ के गाने पर कमर लचका रहे हैं.भागलुपर से दिलीप.Edited by @iajeetkumarpic.twitter.com/BzBa19KOog
— Prakash Kumar (@kumarprakash4u) May 4, 2022
याआधीही व्हिडिओ व्हायरल
गोपाल मंडल हे भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. दरम्यान, याआधीही गोपाल मंडल यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. गोपाल मंडल यांचा रेल्वेमधील हाफ पँटवर असलेला व्हिडिओ खूप चर्चेत होता. त्याआधी गोपाल मंडल यांची शिवभक्ती सुद्धा चर्चेत आली होती, ज्यावेळी कोरोना संकट काळात कावड घेऊन शिवालय पोहोचले होते आणि बंद मंदिर उघडण्यासाठी अडून बसले होते.