मदत मागणाऱ्या महिलेला भाजपच्या मंत्र्यांनी मारली थप्पड; तरीही महिलेने आशीर्वादासाठी पाय धरले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 01:50 PM2022-10-23T13:50:45+5:302022-10-23T14:05:26+5:30

कर्नाटकातील एका गावात एका मंत्र्यांनी महिलेला थप्पड मारल्याची घटना समोर आली आहे. थप्पड मारुनही या महिलेने मंत्र्यांचे पाय धरल्याचे दिसत आहे.

video of Karnataka Housing Minister V Somanna slapping a woman has gone viral on social media | मदत मागणाऱ्या महिलेला भाजपच्या मंत्र्यांनी मारली थप्पड; तरीही महिलेने आशीर्वादासाठी पाय धरले

मदत मागणाऱ्या महिलेला भाजपच्या मंत्र्यांनी मारली थप्पड; तरीही महिलेने आशीर्वादासाठी पाय धरले

Next

बेंगळुरू: कर्नाटकातील एका गावात एका मंत्र्यांनी महिलेला थप्पड मारल्याची घटना समोर आली आहे. थप्पड मारुनही या महिलेने मंत्र्यांचे पाय धरल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना कर्नाटकातील चामराजा नगर जिल्ह्यातील हंगला गावात एका कार्यक्रमादरम्यान घटली. गृहनिर्माण मंत्री व्ही सोमन्ना यांनी एका महिलेला थप्पड मारल्याचे समोर आले.  

'भाजपचं राजकारण फुट पाडण्याचं', भारत जोडो यात्रेत कन्हैय्या कुमारचा हल्लाबोल

शनिवारी ते एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी मंत्र्यांनी २५० लोकांना त्यांच्या घरांच्या चाव्या दिल्या. यावेळी एका महिलेला त्या योजनेचा लाभ मिळाली नाही म्हणून ती महिला संतपली होती. त्या महिलेने यावेळी आरडा ओरड करुन निषेध केला. यावेळी मंत्र्यांनी महिलेला थप्पड मारली. यावेळी माहिलेने  मंत्र्याच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

या कार्यक्रमासाठी मंत्री सोमन्ना दुपारी ३.३० वाजता पोहोचणार होते, मात्र ते २ तास उशिरा पोहोचले. १७५ जणांना ते जमिनीचे वाटप करणार होते. थप्पड मारणाऱ्या महिलेला जमिनीची मालकी हक्क न मिळाल्याने महिलेला राग आला. यावेळी मंत्री सोमन्ना यांनी त्या महिलेला थप्पड मारली.पण नंतर महिलेने मंत्र्यांच्या पाया पडून  माफीही मागितली.

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय खळबळ उडाली आहे. व्हिडिओ शेअर करताना काँग्रेसने ट्विट केले आहे."भाजप सरकारचे मंत्री व्ही सोमन्ना यांनी एका महिलेला थप्पड मारली आहे. महिलेचा गुन्हा असा होता की ती तिची तक्रार घेऊन भाजपच्या मंत्र्याकडे गेली होती. असं ट्विट काँग्रेसने केले. या ट्विटमध्ये काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे.

Web Title: video of Karnataka Housing Minister V Somanna slapping a woman has gone viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.