VIDEO : बाईकसहीत मालकालाही केले टो
By admin | Published: March 9, 2017 11:11 AM2017-03-09T11:11:26+5:302017-03-09T11:11:26+5:30
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि बेशिस्त वाहनधारकांना चाप बसावा म्हणून वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात.
Next
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 9 - शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि बेशिस्त वाहनधारकांना चाप बसावा म्हणून वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. ही कारवाई करताना टोईंग कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये अनेकदा भांडणं, वादविवाद होतात. कधी कधी हा प्रकार भांडणाचं अगदी टोकदेखील गाठतं. मात्र कानपूर शहरातील एक अजब-गजब व्हिडीओ समोर आला आहे.
गस्तीवर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या पथकाने मालकासहीत बाईक क्रेनच्या सहाय्याने ताब्यात घेतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बाईक उचलण्याच्या कारवाईत अडथळा निर्माण करणा-या मालकालाही वाहतूक पोलिसांनी बाईकसहीत ताब्यात घेतले.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा बाईकमालकाने बाईकवरुन उतरण्यास नकार दिला त्यावेळी पोलिसांनी क्रेनच्या मदतीने मालकासहीत बाईक टो केली. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसणा-यांविरोधात वाहतूक पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. बेशिस्त वाहनधारकांमुळे अन्य चालकांना वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. शहरात पार्कींग आणि नो पार्कींग व्यवस्था सुरळीतपणा आणण्यावर वाहतूक पोलिसांकडून भर दिला जात आहे.
#WATCH: Traffic police towed a motorbike with man sitting on it from Bada Chauraha area of Kanpur as he refused to get down. (08/03/17) pic.twitter.com/jbtHhFv7oO
— ANI UP (@ANINewsUP) March 9, 2017