Video - Money Heist स्टाइल मास्क लावलेल्या तरुणाने कारवर चढून उधळल्या नोटा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 05:04 PM2023-10-03T17:04:03+5:302023-10-03T17:04:35+5:30

एक व्यक्ती कारवरून नोटा फेकताना दिसत आहे. तसेच, फेकलेले पैसे जमा करण्यासाठी रस्त्यावर लोकांची झुंबड पाहायला मिळत आहे. रिक्षा, बाईक आणि कार थांबवून लोक लोक पैसे जमा करत होते. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. 

video person throws currency notes on jaipur street on lines of netflix web series money heist | Video - Money Heist स्टाइल मास्क लावलेल्या तरुणाने कारवर चढून उधळल्या नोटा अन्...

Video - Money Heist स्टाइल मास्क लावलेल्या तरुणाने कारवर चढून उधळल्या नोटा अन्...

googlenewsNext

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये भररस्त्यात एका अज्ञात व्यक्तीने चलनी नोटा उडवल्या. पैसे उडवणाऱ्या या व्यक्तीने मास्क लावला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीचा शोध सुरू केला.

नोटा उडवणारी ही व्यक्ती ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या Money Heist या प्रसिद्ध वेब सिरीजने प्रभावित असल्याचं पाहायला मिळतं. याचं कारण म्हणजे त्याने वेब सीरिजच्या पात्राप्रमाणे लाल रंगाचा पोशाख घातला होता आणि त्याचा चेहरा मास्कने झाकलेला होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कारवरून नोटा फेकताना दिसत आहे. तसेच, फेकलेले पैसे जमा करण्यासाठी रस्त्यावर लोकांची झुंबड पाहायला मिळत आहे. रिक्षा, बाईक आणि कार थांबवून लोक लोक पैसे जमा करत होते. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमधील जीटी सेंट्रल मॉलजवळ सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे पोलिसांच्या निदर्शनास आले. जयपूर पोलिसांनी कार क्रमांकाच्या आधारे तरुणाचा शोध घेतला आहे. पोलिसांनी आरोपीला शांतता भंग करण्याच्या कलमाखाली अटक केली आहे.

वेब सिरीजचा चाहता असलेल्या या आरोपीच्या प्राथमिक चौकशीत त्याने हे सर्व केवळ मौजमजेसाठी केल्याचं उघड झालं आहे. सध्या पोलीस ठाण्यात आरोपीची अधिक चौकशी सुरू आहे. त्याच्याबद्दल इतर माहिती गोळा केली जात आहे. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: video person throws currency notes on jaipur street on lines of netflix web series money heist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.