मित्रासाठी कायपण! अपघात झालेला, पेट्रोलसाठी बाटली घेऊन फिरला, शेवटी बुलेटची टाकीच काढली...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 04:49 PM2022-08-18T16:49:57+5:302022-08-18T16:56:43+5:30
माजी नगरसेवक सुशील कुमार बाटली घेऊन पेट्रोल पंपावर गेले होते. मात्र त्यांना कोणीही पेट्रोल दिलं नाही.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. एक माजी नगरसेवक पेट्रोल पंपावर थेट बुलेटची टाकी काढून पेट्रोल भरताना दिसत आहेत. माजी नगरसेवकाला बाटलीमध्ये पेट्रोल भरून हवं होतं. त्यांनी यामागचं कारणदेखील सांगितलं. मात्र पेट्रोल पंप चालकांनी त्यांना बाटलीमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिला. कारण नियमांनुसार बाटलीमध्ये पेट्रोल देण्यास परवानगी नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक सुशील कुमार बाटली घेऊन पेट्रोल पंपावर गेले होते. मात्र त्यांना कोणीही पेट्रोल दिलं नाही. त्यानंतर कुमार यांनी त्यांच्या बुलेटची टाकी काढली आणि ती घेऊन त्यांनी पेट्रोल पंप गाठलं. बुलेटची टाकी घेऊन पंप गाठलेल्या कुमार यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कानपुर में पेट्रोल खत्म होने पर बुलेट की टंकी लेकर पंप पर पहुंच गए पूर्व पार्षद। pic.twitter.com/hx6FYbtWqX
— abhishek kumar agnihotri (@abhishe19913644) August 16, 2022
सुशील कुमार यांच्या मित्राचा अपघात झाला होता. त्याचवेळी कुमार यांच्या बुलेटमधलं पेट्रोल संपलं. त्यामुळे कुमार पेट्रोल भरण्यासाठी बाटली घेऊन पंपावर पोहोचले. मात्र अनेक पंपांवर त्यांना नकार ऐकावा लागला. घातपात होण्याची शक्यता असल्यानं बाटलीमधून पेट्रोल न देण्याचे आदेश पंपांवरील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. सरकारने तसा नियमच केला आहे.
पेट्रोल पंपांवरील कर्मचारी बाटलीमधून पेट्रोल देत नसल्यानं सुशील कुमार यांनी बुलेटची टाकी काढली. ती टाकी घेऊन त्यांनी पेट्रोल पंप गाठलं. त्यांनी पेट्रोलची टाकी एका दुचाकीवर ठेवली आणि त्यात पेट्रोल भरण्यास सांगितलं. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या कोणीतरी त्यांचा व्हिडीओ काढला. तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.