Video: कचरा गाडीत PM मोदी अन् CM योगींचा फोटो, सफाई कर्मचारी बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 07:50 PM2022-07-17T19:50:13+5:302022-07-17T19:51:00+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो एका कचऱ्याच्या गाडीत घालून कर्मचारी नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: Photo of PM Modi and CM Yogi in garbage truck, cleaning staff sacked | Video: कचरा गाडीत PM मोदी अन् CM योगींचा फोटो, सफाई कर्मचारी बडतर्फ

Video: कचरा गाडीत PM मोदी अन् CM योगींचा फोटो, सफाई कर्मचारी बडतर्फ

Next

मथुरा - भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर युएईमधील काही देशांना भारताबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी, कचऱ्याच्या गाडीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोही लावण्यात आला होता. या फोटोवरुन संपूर्ण भारताने युएईतील देशाचा विरोध केला. देशाच्या पंतप्रधानांचा हा अपमान कधीही सहन केला जाणार नाही, असे म्हणत सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध नोंदवला होता. आता, पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो कचऱ्याच्या गाडीत दिसून आली. विशेष म्हणजे ही घटना मुथरा येथील आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो एका कचऱ्याच्या गाडीत घालून कर्मचारी नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे सफाई कर्मचाऱ्याला दोषी मानून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. शनिवारी सफाई कर्मचारी बॉबीपुत्र दुलीचन्द हे कचरा वेचण्यास आले होते. त्यावेळी, ते घेऊन जात असलेल्या कचऱ्याच्या गाडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो दिसून आला. कर्मचाऱ्याने या फोटोला बाजूला काढून ठेवणे अपेक्षित होते. मात्र, त्याने कचऱ्याच्या गाडीतून ते फोटोही नेले. त्यामुळे, सफाई कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. 

मथुरेतील सुभाषनगर महाविद्यालयाजवळ ही घटना घडली आहे. काही स्थानिकांनी कचऱ्याच्या गाडीत हे फोटो पाहिल्यानंतर सफाई कर्मचाऱ्याला जाब विचारला असता त्याने हुज्जत घातल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे, ही घटना प्रशासकीय अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्या कर्मचाऱ्यास सेवेतून बडतर्फ करण्यात आले. दरम्यान, कचरा गाड्यातील हे फोटो बाजूला काढण्यात आले असून अलवर येथील एका डॉक्टराने आपल्या कार्यालयात लावले आहेत. 
 

Web Title: Video: Photo of PM Modi and CM Yogi in garbage truck, cleaning staff sacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.