VIDEO - काश्मिरमध्ये दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी जवानांवर दगडफेक
By admin | Published: March 28, 2017 12:42 PM2017-03-28T12:42:33+5:302017-03-28T15:39:03+5:30
चंदुरा परिसरात चकमक सुरु असताना दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ जवानांवर दगडफेक करणा-या जमावावर सुरक्षा दलाने कारवाई केली.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 28 - जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चंदुरा परिसरात चकमक सुरु असताना दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ जवानांवर दगडफेक करणा-या जमावावर सुरक्षा दलाने कारवाई केली. यात एक जण ठार झाला असून चौघे जखमी झाले आहेत. चंदुरा परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाने चारही बाजूंनी वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली.
शोध मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलातील जवानांवर गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असताना जमाव चालून आला आणि त्यांनी जवानांच्या दिशेने दगडफेक सुरु केली अशी माहिती अधिका-यांनी दिली.
दगडफेक सुरु असताना झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीच्या गळयात गोळी घुसली. रुग्णालयाच्या वाटेवर असताना त्याचा मृत्यू झाला. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या आणि पेलेट गनचा वापर केला. ज्यामध्ये चौघे जखमी झाले. अजूनही दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे.
#WATCH J&K: Encounter underway between Security forces and terrorists in Chadoora in Budgam (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/QrDaBoPh3J
— ANI (@ANI_news) March 28, 2017
J&K:Hand grenade found in house of terrorist Sameer Tiger in Drabgam, Pulwama.Bomb Disposal Squad have destroyed the grenade,terrorist flees pic.twitter.com/PS5jdcFT8w
— ANI (@ANI_news) March 28, 2017
Budgam(J&K) #UPDATE : One killed during a clash with Security forces at the encounter site
— ANI (@ANI_news) March 28, 2017