Video : 'गोल्ड' जिंकणाऱ्या सुमितला पंतप्रधान मोदींचा फोन, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 19:40 IST2021-08-30T19:40:13+5:302021-08-30T19:40:50+5:30
सुमितने पहिल्याच प्रयत्नांत ६६.९५ मीटर लांब भालाफेक करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. दुसऱ्या प्रयत्नात त्यानं आणखी लांब भाला फेकताना ६८.८ मीटर सह नवा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.

Video : 'गोल्ड' जिंकणाऱ्या सुमितला पंतप्रधान मोदींचा फोन, व्हिडिओ व्हायरल
मुंबई - भारताचा भालाफेकपटू सुमित यानं पुरुषांच्या F64 भालाफेक गटात पहिल्याच प्रयत्नांत ६६.९५ मीटर लांब भालाफेक करून वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला. मागील २४ तासांतील भारताचे हे सातवे पदक, तर आजच्या दिवसातील पाचवे पदक ठरले. नेमबाज अवनी लेखराच्या सुवर्णपदकानं आजच्या दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर, भारताचा भालाफेकपटू सुमित यानं पुरुषांच्या F64 भालाफेक गटात वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक जिंकले. सुमितच्या सुवर्ण कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून त्याचं अभिनंदन केलंय.
सुमितने पहिल्याच प्रयत्नांत ६६.९५ मीटर लांब भालाफेक करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. दुसऱ्या प्रयत्नात त्यानं आणखी लांब भाला फेकताना ६८.८ मीटर सह नवा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. तिसऱ्या प्रयत्नात सुमितनं ६५.२७ मीटर भालाफेक केली, परंतु अन्य स्पर्धकांच्या तुलनेत त्यानं याही फेरीत चांगली कामगिरी करून दाखवली. त्यानं पाचव्या प्रयत्नात पुन्हा ६८.५५ मीटर लांब भालाफेकून पुन्हा स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. या कामगिरीसह त्यानं सुवर्णपदकही नावावर केलं. सुमितच्या या कामिगिरीचा देशाला अभिमान असून पंतप्रधानांनीही फोनवरुन त्यांच्याशी संवाद साधला आहे.
देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. सुमितच्या कुटुंबीयांसाठीही ही अभिमानास्पद बाब असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरुन म्हटले. तसेच, देशातील युवा वर्गाला सुमितकडून नक्कीच प्रेरणा मिळेल, असे पीएम म्हणाले. मोदी आणि सुमित यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#WATCH: PM Modi telephoned #SumitAntil &congratulated him on winning Gold & for a historic performance
— ANI (@ANI) August 30, 2021
PM told him that he made the nation proud&appreciated his spirit of resilience. He added that youngsters would be inspired by Sumit.He pointed that he has made his family proud pic.twitter.com/PwKnAGG0rS
रस्ते अपघातात गमावला पाय
योगेश्वर दत्तला आदर्शस्थानी ठेवून सुमितलाही कुस्तीपटू बनायचे होते. पण, २०१५मध्ये एका रस्ता अपघातात ट्रॅक्टर त्याच्या पायावरून गेला अन् त्याला एक पाय गमवावा लागला. द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक नवल सिंग यांच्या सांगण्यावरून त्यानं भालाफेकीला सुरूवात केली. २०१८मध्ये त्यानं आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतला, परंतु तेव्हा तो पाचव्या क्रमांकावर राहिला होता. त्यानंतर २०१९मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यानं रौप्यपदक जिंकून टोक्यो पॅरालिम्पिकची पात्रता निश्चित केली.