Video: PM मोदींची IIT कानपूरला सरप्राईज व्हिसीट, इंजिनिअर्संचा घेतला क्लास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 06:26 PM2021-12-30T18:26:23+5:302021-12-30T18:31:33+5:30
मोदींनी पदवीदान समारंभानंतर या सोहळ्यात उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी सरप्राईज व्हिसीट केली. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा असल्याने मोदींनी ही अचानक भेट दिली.
कानपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर वारंवार दिसून येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींचे युपी दौरे वाढले असून ते तेथील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतेच त्यांनी आयआयटी कानपूरला भेट देत. मोदींच्या सरप्राईज व्हिसीटमुळे कानपूर आयआयटीच्या विद्यार्थ्यांनाही आश्चर्य वाटले. मोदींच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक भाजपा नेत्यांनी हा व्हिडिओ ट्विट करत ही सरप्राईज व्हिसीट असल्याचं म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पदवीदान समारंभासाठी आयआयटी कानपूरमध्ये गेले होते. येथील ५४ व्या पदवीदान समारंभामध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधानांनी देशाची धुरा आता तरुणांनी आपल्या खांद्यावर घ्यावी असं म्हटलं. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषणही केलं. सरधोपट मार्ग सोडून आव्हानांचा स्वीकार करावा आणि येत्या २५ वर्षांमध्ये आपल्याला जसा देश पाहिजे आहे, त्यासाठी काम सुरू करावं असं आवाहनही भावी इंजिनिअर्संना केलं. देशघडणीच्या कार्यात आतापर्यंत आपण खूप वेळ वाया घालविला आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
In his trademark style, PM @narendramodi paid a surprise visit to another block of IIT Kanpur to interact with students who were not a part of the convocation & the students were absolutely thrilled with a one-on-one interaction with him!! #ModiMagic#ModiInKanpurpic.twitter.com/kIffGrbWWp
— Priti Gandhi - प्रीति गांधी (@MrsGandhi) December 28, 2021
मोदींनी पदवीदान समारंभानंतर या सोहळ्यात उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी सरप्राईज व्हिसीट केली. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा असल्याने मोदींनी ही अचानक भेट दिली. यावेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही त्यांच्यासमवेत होते. महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असल्याने विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत होते. दरम्यान, भाजपा नेत्या प्रिती गांधी यांनी मोदींच्या या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, ही सरप्राईज भेट असल्याचा दावाही त्यांनी केलाय. त्यावरुन, नेटीझन्सने त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.