बापरे! 300 किमी वेगाने बाईक चालवणं पडलं महागात, झालं असं काही...; थरकाप उडवणारा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 04:20 PM2020-07-22T16:20:29+5:302020-07-22T16:31:31+5:30
लॉकडाऊनमध्ये असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र वेगाने बाईक चालवणाऱ्या व्यक्तीला हे मात्र चांगलंच महागात पडलं आहे
नवी दिल्ली - भरधाव वेगात बाईक चालवायला अनेकांना आवडतं. वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करत जास्त वेगात बाईक चालवण्याचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लॉकडाऊनमध्ये असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र वेगाने बाईक चालवणाऱ्या व्यक्तीला हे चांगलंच महागात पडलं आहे. पोलिसांनी निष्काळजीपणाने वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमधील ही घटना आहे. सुपरबाईकचं वेड असलेल्या एका व्यक्तीने लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर जवळपास 300 किलोमीटर प्रतितास वेगाने Yamaha R1 ही बाईक चालवली. मात्र त्याला आता याची चांगलीच किंमत मोजावी लागली आहे. वेगाच्या मर्यादेपेक्षा अधिक वेगात बाईक चालवणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. पोलिसांनी बाईक तर जप्त करून त्याला अटक केली.
This video made viral by the rider.. going at a dangerous speed of almost 300 kmph at Ecity flyover putting his own & others life at risk..CCB traced the rider & seized bike Yamaha 1000 CC.. handed over to traffic.. #drivesafe.. @CPBlr@BlrCityPolicepic.twitter.com/RoC6csoR38
— Sandeep Patil IPS (@ips_patil) July 21, 2020
मुनियप्पा असं बाईक चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव असून त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला होता. बंगळूरूतील ई-सिटी फ्लायओव्हरवर त्याने सुमारे 300 किमी वेगाने ही बाईक चालवली. बंगळूरूचे पोलीस सहआयुक्त संदीप पाटील यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. "एका बाईक रायडरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सीसीबीने त्या व्यक्तीला शोधून काढले असून त्याची Yamaha 1000cc बाईक जप्त करण्यात आली आहे" असं संदीप पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
लय भारी! तुफान व्हायरल होणारा 'हा' भन्नाट व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल पत्रकाराचं भरभरून कौतुकhttps://t.co/oPWSZK930j#coronavirus#CoronaUpdates#Mask#SocialMedia#Video
— Lokmat (@MiLOKMAT) July 22, 2020
CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! मास्क वापरणं अत्यंत गरजेचं नाहीतर...https://t.co/AYvJGow5Qk#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#Mask
— Lokmat (@MiLOKMAT) July 22, 2020
महत्त्वाच्या बातम्या
प्रियंका गांधी लवकरच सरकारी बंगला सोडणार, 'या' ठिकाणी राहायला जाणार
"वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज"; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
कौतुकास्पद! कोरोनावर मात केल्यानंतर चक्क उद्योगपतीने ऑफिसला बनवलं रुग्णालय, मोफत देतोय उपचार
कोरोनाचा फटका! नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
CoronaVirus News : हवेतूनही होतो कोरोनाचा प्रसार; मास्कबाबत तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...
पावसाचे थैमान! आठ राज्यांत तब्बल 470 जणांचा मृत्यू