VIDEO: अमित शहांच्या कार्यक्रमातून परणाऱ्या पोलीस व्हॅनची 3 तरुणांना धडक; पोलिसांनी काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 04:12 PM2022-10-12T16:12:59+5:302022-10-12T16:14:03+5:30

अपघातानंतर गाडीने पेट घेतला, तरुणाचा होरपळून मृत्यू झाला.

VIDEO: Police van coming from Amit Shah's program hits 3 youths; they died , police ran away | VIDEO: अमित शहांच्या कार्यक्रमातून परणाऱ्या पोलीस व्हॅनची 3 तरुणांना धडक; पोलिसांनी काढला पळ

VIDEO: अमित शहांच्या कार्यक्रमातून परणाऱ्या पोलीस व्हॅनची 3 तरुणांना धडक; पोलिसांनी काढला पळ

googlenewsNext

पाटणा: बिहारच्या छपरा-सिवान महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. बिहारपोलिसांना घेऊन जाणाऱ्या बसची धडक बसून तीन दुचाकीस्वार ठार झाले. अपघातानंतर बसच्या इंधन टाकीचा स्फोट झाल्याने बसला आग लागली आणि यात बसखाली अडकलेला एक तरुण जळून खाक झाला. 

पोलीस पळून गेले
अपघात एवढा भीषण होता की, धडक बसल्यानंतर एक तरुण बससोबत शंभर फूट फरफटत गेला आणि बसखाली अडकला. यादरम्यान, बसच्या पेट्रोल टँकला आग लागून मोठा भडका उडाला. यावेळी बसखाली अडकलेला तरुण जळत राहिला. धक्कादायक बाब म्हणजे, त्या तरुणाला वाचवण्याऐवजी पोलीस कर्मचारी पळून गेले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. 

छपरा जिल्ह्यातील रिविलगंज पोलिस स्टेशन अंतर्गत देवरिया गावाजवळ ही घटना घडली. बस सीताबरियारा येथे दिवंगत राजकीय नेते जयप्रकाश नारायण यांच्या 120व्या जयंती सोहळ्यातून परतत होती. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित होते. या भीषण अपघातात मृत्यू झालेले तिन्ही तरुण कोपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोखर भिंडा गावातील रहिवासी होते. मृतांमध्ये बाबूलाल मांझी, कुंदन मांझी आणि तिसचा तरुण मागदेह गावातील रहिवासी होता.

Web Title: VIDEO: Police van coming from Amit Shah's program hits 3 youths; they died , police ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.