VIDEO - राजू शेट्टी, मेधा पाटकर यांना अटक
By Admin | Published: July 6, 2017 11:08 AM2017-07-06T11:08:09+5:302017-07-06T13:33:03+5:30
ऑनलाइन लोकमत बुढा, दि.6- मध्यप्रदेशात कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आदोलनाला हिंसक वळणही ...
ऑनलाइन लोकमत
बुढा, दि.6- मध्यप्रदेशात कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आदोलनाला हिंसक वळणही लागलं होतं. याच पार्श्वभूमीवर शेती मालाला योग्य भाव आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींनी किसान मुक्ती यात्रा काढली. पण ही किसान मुक्ती यात्रा अडवण्यात आली असून, पोलिसांनी खासदार राजू शेट्टींसह, मेधा पाटकर, रविकांत तुपकर, प्रकाश पोफळे,सागर संभुशेटे यांना अटक केली आहे तसेच पोलिसांनी रॅपिड अॅक्शन फोर्स , वॉटर गनसह हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली किसान मुक्ती यात्राला मध्यप्रदेशातल्या बुढामधून सुरुवात झाली आहे. या मोर्चात राजू शेट्टींसह सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, योगेंद्र यादव तसंच 25 राज्यातले शेतकरी सहभागी झाले आहे. बूढामध्ये या किसान मुक्ती यात्रेसाठी 600 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमधून प्रवास करत ही यात्रा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला दिल्लीत पोहणार आहे. तसंच दिल्लीत पोहोचल्यानंतर 18 जुलै रोजी जंतरमंतरवर देशभरातील शेतकऱ्यांनी एकत्र यावं असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच जतंरमंतरवर शेतकरी नेते आणि शेतकरी आंदोलनही करणार आहेत.
या यात्रेत देशभरातील 130 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होतील. 18 जुलैला ही यात्रा दिल्लीत पोहचेल. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अशा मागण्या या यात्रेत असतील.”, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली होती.
आणखी वाचा
भुजबळ यांच्या ३00 कोटींच्या मालमत्तांवर टाच
सोशल मीडियावर शब्द जपून वापरा, अन्यथा लागणार ‘अॅट्रॉसिटी’
आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी १२ ‘वॉकी-टॉकी’
श्रद्धांजली सभेला परवानगी नाकारली
गेल्या महिन्यात मंदसौर येथे शेतकरी आंदोलनावर मध्यप्रदेश पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर किसान मुक्ती यात्रेची सुरुवात मंदसौरपासून होत आहे. सुरुवातीला बही चौपाटीवर ६ जुलैला सकाळी ११ वाजता श्रद्धांजली सभा होणार होती. त्यास मध्यप्रदेश पोलिसांनी परवानगी नाकारली असून सर्वत्र चोख बंदोबस्त आहे. दरम्यान सरकारचा विरोध असला तरी श्रद्धांजली सभा होणारच असा निर्धार शेतकरी नेत्यांनी घेतला आहे.
https://www.dailymotion.com/video/x84574e