VIDEO : सुकमाचा बदला ! स्पेशल कमांडोंच्या कारवाईत 20 नक्षलवादी ठार

By admin | Published: May 17, 2017 11:07 AM2017-05-17T11:07:22+5:302017-05-17T13:24:05+5:30

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारीपासून ते मंगळवारपर्यंत नक्षलवाद्यांविरोधात चालवण्यात आलेल्या मोहीमेअंतर्गत जवळपास 20 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा सुरक्षा अधिका-यांकडून करण्यात येत आहे.

VIDEO: Revenge of the Sukma! 20 Naxalites killed in special command | VIDEO : सुकमाचा बदला ! स्पेशल कमांडोंच्या कारवाईत 20 नक्षलवादी ठार

VIDEO : सुकमाचा बदला ! स्पेशल कमांडोंच्या कारवाईत 20 नक्षलवादी ठार

Next

ऑनलाइन लोकमत

रायपूर, दि. 17 - नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर 300 नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह 25 जवान शहीद झाले होते. संपूर्ण देशाला हादरवणा-या सुकमा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा सीआरपीएफ जवानांनी बदला घेतला आहे.
 
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारीपासून ते मंगळवारपर्यंत नक्षलवाद्यांविरोधात चालवण्यात आलेल्या मोहीमेअंतर्गत जवळपास 20 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा सुरक्षा अधिका-यांकडून करण्यात येत आहे. 
 
कोब्रा बटालियननं 13 - 14 मे रोजीच्या रात्री सुकमा आणि बिजापूरमध्ये चालवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये 15 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
 
सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा पोलीस स्टेशन अंर्तगत येणा-या रायगुंडममधील जंगलात सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षादलाच्या जवानांनी 15 ते 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तर रविवारी करण्यात आलेल्या कारवाईत सुरक्षादलाचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. 
 
दरम्यान, या कारवाईसंदर्भातील एक व्हिडीओदेखील ""एएनआय"" या वृत्तसंस्थेनं जारी केला आहे. व्हिडीओमध्ये स्पेशल कमांडो ""कोब्रा""चे जवान व नक्षलवाद्यांमधील चमकम दिसत आहे. गोळीबाराचा आवाजही ऐकू येत आहे. 
नक्षलवाद्यांचा खात्मा
पोलीस निरीक्षकांनाही असेही सांगितले की, घटनास्थळावरील रक्ताचे डाग व अन्य मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे येथे नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात खात्मा करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या मोहीमेत जखमी जवानांना हेलिकॉप्टरमधून रायपूर येथे आणण्यात आले. जखमी जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत. 
100-150 नक्षलवादी सक्रिय 
बिजापूरचे पोलीस अधीक्षक के.एल. ध्रुव यांनी सांगितले की, सीआरपीएफ, डीआरजी, जिल्हा पोलीस आणि कोब्रा बटालियनमधील जवानांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. तीन दिवस नक्षलवाद्यांविरोधात अभियान चालवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगुंडम जंगलात 100-150 नक्षलवादी सक्रिय आहेत. 
 
दरम्यान, दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कारवाईत 20 नक्षलवादी मारले गेलेत. या चकमकीनंतर  नक्षलवाद्यांनी खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह घेऊन जंगलात पळ काढल्याचे वृत्त आहे. 
 
 

Web Title: VIDEO: Revenge of the Sukma! 20 Naxalites killed in special command

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.