Video: अयोध्येत सचिन अन् रजनीकांत शेजारी; PM मोदी आले अन् नमस्कार करुन गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 11:39 AM2024-01-23T11:39:40+5:302024-01-23T11:43:50+5:30

बिग बी अमिताभ बच्चनपासून ते मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक दिग्गज रामनाम जपताना दिसून आले.  

Video: Sachin Tendulkar and Rajinikanth side by side in Ayodhya; PM Narendra Modi came and saluted | Video: अयोध्येत सचिन अन् रजनीकांत शेजारी; PM मोदी आले अन् नमस्कार करुन गेले

Video: अयोध्येत सचिन अन् रजनीकांत शेजारी; PM मोदी आले अन् नमस्कार करुन गेले

रामभक्तांच्या ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीराम त्यांच्या भव्य-दिव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. २२ जानेवारी रोजी हजारो क्विंटल फुलांनी अयोध्या नगरी सजली, देशभरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण होते. आज आपले राम आले आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. अयोध्येतील या सोहळ्याला  लाखो भाविक अन् देशातील बड्या हस्तींनी उपस्थिती दर्शवली. त्यामध्ये, बिग बी अमिताभ बच्चनपासून ते मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक दिग्गज रामनाम जपताना दिसून आले.  

"२२ जानेवारी २०२४ चा हा सूर्य एक अद्भुत तेज घेऊन आला आहे... कॅलेंडरवर लिहिलेली ही तारीख नाही, तर नव्या काळचक्राचा उदय आहे.", असे मोदींनी आपल्या भाषणात म्हटले. आमचे रामलला आता तंबूत राहणार नाहीत, आता रामलला दिव्य मंदिरात राहणार आहेत. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत. त्याग आणि तपश्चर्येनंतर आपले राम आले आहेत" असंही मोदी म्हणाले. आपल्या भाषणानंतर मोदींनी व्यासपीठावरील संतांचे दर्शन घेऊन मार्गक्रमण केले. त्यानंतर, समोर उभे असलेल्या दिग्गजांच्या, निमंत्रितांच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कारही केला. 

देशभरातून प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या ७ हजार दिग्गजांना मोदींनी भेटून नमस्कार केला. ज्यांच्या भेटीसाठी दररोज रांगा लागतात, ते दिग्गजही येथे रांगेत पाहायला मिळाले. त्यामध्ये, बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योगपती, संत, महाराज आणि राजकीय नेतेही दिसून आले. बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन, सुपरस्टार रजनीकांत हेही सपत्नीक हजर होते, तर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरही रामनामाचा जप करताना दिसून आले. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी आलेल्या दिग्गजांच्या बैठक व्यवस्थेत सचिन तेंडुलकर आणि रजनीकांत शेजारी शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं. या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात दोघेही जय श्रीराम म्हणताना दिसत आहेत.


दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी हेही सहकुटुंब अयोध्येत पोहोचले होते. तर, श्री श्री श्री रविशंकर, बाबा रामदेव यांच्यासह अनेक मोठमोठे संत, साधूही अयोध्या नगरीत होते. मोदींनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला. यावेळी, सचिन तेंडुलकर आणि रजनीकांत यांनाही मोदींनी हात जोडून नमस्कार केल्याचं पाहायला मिळालं. तर, बिग बी अमिताभ बच्चन यांना नमस्कार करताना मोदींनी त्यांच्या हाताला लागलेल्या जखमेबद्दल विचारपूस केली. लाखो भाविकांसह हजारोंच्या संख्येने जमलेल्या दिग्गजांच्या मुखीही एकच नारा एकही नाम... जय श्रीराम असल्याचं दिसून आलं. 

Web Title: Video: Sachin Tendulkar and Rajinikanth side by side in Ayodhya; PM Narendra Modi came and saluted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.