Video - उंचावरुन कोसळणारा हा निसर्गरम्य धबधबा पाहून म्हणाल, व्वा क्या बात है...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 04:30 PM2018-08-15T16:30:51+5:302018-08-15T16:37:09+5:30
मुसळधार पावसानंतर शिमोगा येथील जोग धबधबा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. या धबधब्यावरुन वाहणारे पाणी पाहताना निसर्गाच्या सुंदरतेचे करावे तेवढे कौतूक कमीच, किंवा व्वा क्या बात है,
बंगळुरू - मुसळधार पावसानंतर शिमोगा येथील जोग धबधबा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. या धबधब्यावरुन वाहणारे पाणी पाहताना निसर्गाच्या सुंदरतेचे करावे तेवढे कौतूक कमीच, किंवा व्वा क्या बात है, असे म्हटल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमारेषेवरील शरावती नदीवर हा धबधबा आहे. सध्या या धबधब्यातून वाहणाऱ्या पाण्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून निसर्गरम्य ठिकाणांची मजा लुटण्यासाठी पर्यटक योजना आखत आहेत. तुम्हीही निसर्गरम्य ठिकाणाच्या शोधात असाल, तर कर्नाटकमधील जोग धबधबा तुमचा हौस पूर्ण करु शकतो. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील हा धबधबा सध्या जोरात वाहताना दिसत आहे. त्यामुळे येथे पर्यटक गर्दी करत असून आहेत. नैसर्गिक सौंदर्यासोबतच हा धबधबा दोन्ही राज्यातील नागरिकांच्या आर्थिक मदतीचेही केंद्र बनले आहे. या धबधब्यातून खाली पडणारे पाणी साबणाच्या फेसाप्रमाणे असून पर्यटकांना अल्हादायक गारवा देते. या धबधब्याजवळ वीजनिर्मित्तीसाठीची मोठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. या निसर्गरम्य ठिकाणाचे मूळ नाव हे जोग प्रपात असून जोगाड गुंडीचे हे इंग्रजी नाव आहे. जेरसप्पा नावाच्या एका प्रदेशाचाच हा एक भाग आहे. त्यामुळे या जोग धबधब्याला जेरसप्पा धबधबाही म्हणतात. जोग धबधबा हा देशातील सर्वात उंचावरुन पाणी कोसळणारा द्वितीय क्रमांकाचा धबधबा आहे. तर मेघालयातील नोहकलिकाई हा देशातील क्रमांक एकचा धबधबा आहे.
पाहा व्हिडिओ -
#WATCH Visuals of Jog falls in Karnataka's Shimoga during monsoon pic.twitter.com/q2jRMRUXzR