Video - धक्कादायक! स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर सरकारी शाळेत अफूचं वाटप; घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 05:10 PM2022-08-16T17:10:49+5:302022-08-16T17:10:53+5:30
स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन केल्यानंतर एका सरकारी शाळेत अफूचं वाटप करण्यात आल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे.
नवी दिल्ली - देशात मोठ्या उत्साहात आणि आनंदात सोमवारी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. याच दरम्यान एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन केल्यानंतर एका सरकारी शाळेत अफूचं वाटप करण्यात आल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील गुडमालानी गावात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेरच्या गुडमालानी भागातील एका सरकारी शाळेत ही घटना घडली. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर काही लोक शाळेत पोहोचले होते. ते एकमेकांना अफू देत होते. या घटनेचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये झेंडावंडनाचा कार्यक्रम झाल्यानंतर काही विद्यार्थी फिरताना दिसत आहेत. त्याच दरम्यान काही लोक आले आणि अफूचं वाटप करू लागले. या घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Rajasthan: स्वतंत्रता दिवस पर सरकारी स्कूल में बांटी गई अफीम, वीडियो वायरल होने पर अधिकारियों के हाथ-पांव फूले #Bikaner#Rajasthan#OpiumBikanerSchool#ViralVideohttps://t.co/0EKmtV1xjfpic.twitter.com/03MSs8qwWn
— Ravindra Bhajni (@ravibhajni) August 16, 2022
सरकारी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समजताच शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. जवळपास दोन तास शाळेमध्ये हे अफूचं वाटप सुरू असल्याची माहिती मिळत आहे अधिकारी ओमप्रकाश विश्नोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाडमेरच्या गुडमालानी भागातील एका सरकारी शाळेत ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच ते शाळेत पोहोचलो. मात्र, तोपर्यंत तिथे कोणीही नव्हतं. या घटनेची चौकशी सुरू असून आम्ही विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवत आहोत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.