Video: 'शो मस्ट गो ऑन'! जाता जाता डॉ. के.के. अग्रवाल यांनी दिला 'आदेश', मोफत ओपीडी सुरुच राहणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 01:18 PM2021-05-20T13:18:35+5:302021-05-20T13:20:25+5:30

Dr KK Aggarwal last video Goes Viral: डॉ. के.के. अग्रवाल हे कोरोनावर मात करून पहिल्यांदा हॉस्पिटलमधून बाहेर आले होते, त्यांच्या नाकात ऑक्सिजनचा पाईप होता. तेव्हा त्यांनी एक संदेश दिला होता. आज त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Video: 'Show Must Go On'! Dr KK Aggarwal in last video before death, free OPD will continue ... | Video: 'शो मस्ट गो ऑन'! जाता जाता डॉ. के.के. अग्रवाल यांनी दिला 'आदेश', मोफत ओपीडी सुरुच राहणार...

Video: 'शो मस्ट गो ऑन'! जाता जाता डॉ. के.के. अग्रवाल यांनी दिला 'आदेश', मोफत ओपीडी सुरुच राहणार...

Next

Dr KK Aggarwal News: इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. के.के. अग्रवाल (Dr KK Aggarwal) यांचे सोमवारी रात्री 11.30 वाजता निधन झाले. मात्र, त्यांनी जाता जाता त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलला, फाऊंडेशनला एक आदेश दिला होता. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी त्यांच्या या दर्यादिलीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. (Social media is flooded with tweets and comments thanking and appreciating Dr Aggarwal for his selfless efforts)

Corona Test at Home: मोठा दिलासा! आता घरबसल्या स्वत:च करा कोरोना चाचणी; टेस्ट किटला परवानगी, जाणून घ्या किंमत...


डॉ. के.के. अग्रवाल हे कोरोनावर मात करून पहिल्यांदा हॉस्पिटलमधून बाहेर आले होते, त्यांच्या नाकात ऑक्सिजनचा पाईप होता. या व्हिडीओमध्ये ते म्हणत होते की, ''मी या जगात असेन वा नसेन, द शो मस्ट गो ऑन.'' 

Black Fungus: ब्लॅक फंगसचा धोका कसा ओळखावा? ही आहेत लक्षणे, उपाय; AIIMS कडून नव्या गाईडलाईन जारी


ग्रवाल यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्समधील ट्रामा सेंटर येथे उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अग्रवाल यांनी दोन महिन्यांपूर्वीच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. पण, गेल्याच महिन्यात त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली. सन 2010 मध्ये अग्रवाल यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. डॉ. अग्रवाल आपल्या व्यवसायाने प्रसिद्ध होतेच, पण गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा देणे आणि दिलदारपणामुळेही ते लोकांचे आवडते होते. कोरोना काळातही डॉक्टरांच्या पाठिशी ते खंबीरपणे उभे राहिले.



हार्ट केयर फाउंडेशन ने घेतला मोठा निर्णय...
डॉ. के.के. अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी मोठा निर्णय घेत त्यांचे समाजकार्य पुढे सुरु ठेवले आहे. हार्ट केयर फाउंडेशन ऑफ इंडियाने डॉ. के.के. अग्रवाल यांच्या नावे डॉ केके रिसर्च फंडद्वारे मोफत ओपीडी सुरु करण्याचा निर्णय घेतला. ही ओपीडी रोज सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये देशभरातील लोक ऑनलाईनच्या माध्यमातून तेथील डॉक्टरांचे आजारावरील सल्ले घेऊ शकतात. 

CoronaVirus Alert: दुसरी लाट जुलैपर्यंत थांबणार; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत SUTRA तज्ज्ञांचा केंद्राला इशारा


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केके अग्रवाल यांनी रुग्णांना ऑनलाईन मदत पोहोचवली होती. तसेच याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत कोरोनोबाबत जागरुकताही करत होते. 

Read in English

Web Title: Video: 'Show Must Go On'! Dr KK Aggarwal in last video before death, free OPD will continue ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.