VIDEO : दिल्ली युनिव्हर्सिटीत काश्मीरच्या आझादीचे नारे
By Admin | Published: February 23, 2017 04:21 PM2017-02-23T16:21:57+5:302017-02-23T16:26:58+5:30
दिल्ली युनिव्हर्सिटीच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये मंगळवारी चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांकडून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाला हिंसक वळण
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 -दिल्ली युनिव्हर्सिटीच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये मंगळवारी चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांकडून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाला हिंसक वळण लागलं. यावेळी काश्मीरच्या आझादीचे नारे दिल्याचं आता समोर आलं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये विद्यार्थी काश्मीरच्या आझादीचे नारे देताना दिसत आहेत.
दिल्लीच्या रामजस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली युनिवर्सिटीची विद्यार्थी संघटना आणि अभाविप विरोधात निषेध मोर्चा आयोजन करण्याची घोषणा केल्यानंतर येथे वातावरण तापलं आणि मारहाणीला सुरूवात झाली. यामध्ये जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. यामध्ये एक शिक्षक, 10 पोलीस कर्मचारी आणि काही पत्रकारही जखमी झाले.
रामजस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या निषेध मोर्चात जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिद सहभागी होणार होता. खालिदला गेल्या वर्षी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती, सुटका झाल्यावर त्याचं अपहरण झालं होतं. उमर खालिदवरूनच हा गोंधळ झाल्याचं वृत्त आहे.
Just received this video clip of ultra left protest inside Ramjas College. Slogan is: 'Hum Kya Chahte Azadi, Kashmir Maange Azadi'. Tragic. pic.twitter.com/9KF0eDqNxX
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) February 22, 2017