Video - समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दलाच्या जाहीर सभेत मंच कोसळला, नेते पडले खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 08:53 AM2021-12-24T08:53:06+5:302021-12-24T08:55:12+5:30

Video Stage Collapses In SP RJP Rally : एकाच वेळी जास्त लोक मंचावर आल्याने मंच कोसळला आणि जे पायऱ्यांवर उभे होते ते देखील खाली पडल्याने काही जण जखमीही झाले आहेत.

Video stage collapses in sp rld joint public rally in aligarh as rld leader jayant chaudhary reaches | Video - समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दलाच्या जाहीर सभेत मंच कोसळला, नेते पडले खाली

Video - समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दलाच्या जाहीर सभेत मंच कोसळला, नेते पडले खाली

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील अलीगड येथे समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाच्या संयुक्त सभेदरम्यान मंच कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी येताच मंच तुटला आणि अनेक नेते खाली पडले. घाईगडबडीत आजूबाजूला उपस्थित लोकांनी नेते व कार्यकर्त्यांना बाहेर काढले. यादरम्यान काही जण जखमीही झाले आहेत. जयंत चौधरी अलीगडमधील इगलास येथे आयोजित सभेला संबोधित करणार होते. जयंत चौधरी मंचावर आल्याचे वृत्त समजताच जमावाने आरडाओरडा, धक्काबुक्की करत बॅरिकेड्स तोडले. 

एकाच वेळी जास्त लोक मंचावर आल्याने मंच कोसळला आणि जे पायऱ्यांवर उभे होते ते देखील खाली पडल्याने काही जण जखमीही झाले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी अलिगढच्या इगलास येथे होणाऱ्या समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदलाच्या संयुक्त सभेकडे शक्तीप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे. सपा-आरएलडीच्या या सभेद्वारे सपा प्रमुख अखिलेश यादव आणि आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी हे एकाच मंचावर सहभागी होणार होते. मात्र होम आयसोलेशन असल्यामुळे अखिलेश यादव या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत.

"तीन दिवस सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाही"

अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव आणि त्यांच्या मुलीचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सपा प्रमुखांची कोरोना चाचणी झाली. होम आयसोलेशनबाबत माहिती देताना त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. "कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याने, खबरदारी म्हणून आम्ही तीन दिवस सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाही" असं म्हटलं आहे. 

उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न 

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरएलडी आणि समाजवादी पक्षाने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्ष संयुक्त रॅलीद्वारे पश्चिम उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जाटबहुल भागात आरएलडी जास्त लक्ष देत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील या जिल्ह्यांमध्ये जयंत चौधरी हे शेतकरी आंदोलनात खूप सक्रिय राहिले आहेत. त्याचबरोबर या भागातील इतर समाजावर भाजपाचीही नजर आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Video stage collapses in sp rld joint public rally in aligarh as rld leader jayant chaudhary reaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.