VIDEO : रांगेत उभे रहात पंतप्रधानांच्या आईंचा नोटबंदीला पाठिंबा

By admin | Published: November 15, 2016 12:17 PM2016-11-15T12:17:07+5:302016-11-15T17:12:29+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांनी बँकेबाहेर सर्वसामान्यांप्रमाणे रांग लावून नोटा बदलून घेतल्या आहेत.

VIDEO: Standing in the queue support the Prime Minister's note ban | VIDEO : रांगेत उभे रहात पंतप्रधानांच्या आईंचा नोटबंदीला पाठिंबा

VIDEO : रांगेत उभे रहात पंतप्रधानांच्या आईंचा नोटबंदीला पाठिंबा

Next

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. 15 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी नोटा बदलून घेण्यासाठी बँकेमध्ये दाखल झाल्या होत्या. सर्वसामान्यांप्रमाणेच बँकाबाहेर रांग लावून हीराबेन यांनी जुन्या नोटा बदलून घेतल्या आहेत.  
 
गांधी नगरमधील रायसेन परिसरातील 'ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स' येथे पंतप्रधानांच्या आई हीराबेन यांनी चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा रांग लावून बदलून घेतल्या. 
 
बँकेबाहेर सर्वसामान्यांप्रमाणे रांग लावून हीराबेन यांनी त्यांचा मुलगा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. हीराबेन यांनी 4,500 रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतल्या.
 
 
 

Web Title: VIDEO: Standing in the queue support the Prime Minister's note ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.