Video : 'त्या' गरीब महिलेला चक्क राज्याच्या पोलिस महासंचालकांचा 'कडक सॅल्यूट'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 04:31 PM2020-04-20T16:31:52+5:302020-04-20T16:35:29+5:30

कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देणाऱ्या सर्वांप्रति आदर भाव व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थाळी अन् टाळी वाजविण्याचं आवाहन देशवासियांना केलं होतं.

Video: Strict salute of the state police director general for 'that' poor woman of andhra pradesh who serv coldrinks to policeman | Video : 'त्या' गरीब महिलेला चक्क राज्याच्या पोलिस महासंचालकांचा 'कडक सॅल्यूट'

Video : 'त्या' गरीब महिलेला चक्क राज्याच्या पोलिस महासंचालकांचा 'कडक सॅल्यूट'

Next

हैदराबाद - पतंप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवून ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर केले. लोकांना घरात राहण्याचे आवाहन, गावच्या सरपंचांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वच स्तरातून होत आहे. मात्र, अद्यापही लोकं घराबाहेर पडत आहेत. पोलिसांकडून लोकांना सातत्याने घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, प्रसंगी पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्यांना प्रेमाने अन् काठीनेही सांगण्यात येत आहे. सध्या देशातील वैद्यकीय क्षेत्र आणि पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण आहे. पोलिसांच्या या कामाची, तणावाची दखलही सर्वसामान्य लोकांनाकडून घेतल्याचं दिसून येत आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देणाऱ्या सर्वांप्रति आदर भाव व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थाळी अन् टाळी वाजविण्याचं आवाहन देशवासियांना केलं होतं. त्यानंतर, या लढाईत देश एकत्र असल्याचा संदेश देण्यासाठी घराघरात लाईट बंद करुन दिवा, लावण्याचेही आवाहन मोदींनी केलं होतं. मोदींच्या या आवाहनाला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे मोदींच्या आवाहनानंतर अत्यावश्य  सेव बजावणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांप्रति समाजमनात आदर निर्माण झाला आहे. त्यातूनच, या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांन मदत देणं, त्यांना आदर देणं अशा लहान पण भावनिक कृती नागरिकांकडून होत आहेत. त्यामध्ये, पोलिसांना चहा नाश्ता देणं, पोलिसांप्रती कविता, स्लोगन्स आणि सोशल मीडियातून आदर व्यक्त होत आहे. यासंदर्भातील व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

आंध्र प्रदेश पोलिसांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये, कडक उन्हाच्या पाऱ्यात आपलं कर्तव्य बजावताना पोलीस दिसत आहेत. याच पोलिसांना एका महिलेकडून कोल्ड्रींक्सच्या दोन बाटल्या देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे महिन्याला केवळ ३५०० रुपये कमावणारी ही गरिब महिला मनाने किती श्रीमंत आहे, हेच या व्हिडीओतून दिसतंय. पोलिसांना कोल्ड्रींक्स देताना तिच्या चेहऱ्यावरील आनंद अन् समाधान हे कित्येक महिन्यांच्या पगारीपेक्षा जास्त आहे. पोलिसांनाही महिलेच्या दातृत्वाचं कौतुक आहे. म्हणूनच, आंध्र प्रदेशच्या संपूर्ण पोलीस फोर्सने या महिलेला, अम्मा ग्रॅड सॅल्यूट टू यू... असे म्हणत कडक सॅल्यूट मारला. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, चक्क आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक गौतम सवांग यांनीही या महिलेच्या दातृत्वाला सलाम ठोकला. ही महिला पूर्व गोदावरी येथील एका खासगी शाळेत काम करत असून तिला महिन्याला ३५०० रुपये पगार मिळतो. दोन दिवसांपूर्वीच मी आपला व्हिडीओ पाहिला होता, तेव्हाच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तुमच्याशी संपर्क साधण्याचं कळवलं होतं. आज तुम्हाला धन्यवाद देतो, तुम्ही पोलिसांबद्दल दाखवलेली ममता पाहून आम्ही भावुक झाल्याचे पोलीस महासंचालक सवांग यांनी म्हटलं. विशेष म्हणजे सवांग यांनी संबंधित महिलेला कडक सॅल्यूटही केला. 

दरम्यान, आंध्र प्रदेशात कोरोनाचे ६०३ रुग्ण आढळून आले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वच यंत्रणा या कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपलं योगदान देत आहे. 

Web Title: Video: Strict salute of the state police director general for 'that' poor woman of andhra pradesh who serv coldrinks to policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.