Video: भारताकडे अभेद्य शक्ती! DRDO ला मोठे यश; हाइपरसोनिक मिसाईलची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 05:20 PM2020-09-07T17:20:53+5:302020-09-07T17:24:19+5:30

भारताकडे आता हायपरसोनिक मिसाईल विकसित करण्याची क्षमता आलेली आहे. डीआरडीओ पुढील पाच वर्षांत स्क्रॅमजेट इंजिनासह हे मिसाईल तयार करू शकणार आहे.

Video: success for DRDO; Hypersonic missile launch who destroy target in 1 hour | Video: भारताकडे अभेद्य शक्ती! DRDO ला मोठे यश; हाइपरसोनिक मिसाईलची चाचणी

DRDO has successfully demonstrated the Hypersonic air-breathing scramjet technology with the flight test of Hypersonic Technology Demonstration Vehicle (HSTDV).

Next

नवी दिल्ली : भारतान हायपरसोनिक मिसाईल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौछा असा देश बनला आहे ज्याच्याकडे स्वत:चे हाइपरसोनिक तंत्रज्ञान आहे. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनाइजेशन (DRDO) ने ओडिशाच्या बालासोरमध्ये हायपरसोनिक तंत्रज्ञानाच्या डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल HSTDV टेस्ट यशस्वी पूर्ण केली आहे. हे मिसाईलच असून हवेत आवाजाच्या ६ पट वेगाने अंतर कापते. म्हणजेच दुष्मनाच्या एअर डिफेन्स सिस्टिमला या मिसाईलचा मागमूसही लागणार नाही. 


भारताकडे आता हायपरसोनिक मिसाईल विकसित करण्याची क्षमता आलेली आहे. डीआरडीओ पुढील पाच वर्षांत स्क्रॅमजेट इंजिनासह हे मिसाईल तयार करू शकणार आहे. या मिसाईलचा वेग एवढा प्रचंड आहे की, सेकंदात हे मिसाईल दोन किमीचे अंतर कापणार आहे. महत्वाचे म्हणजे हे तंत्रज्ञान दोन्ही उद्देशांसाठी वापरता येणार आहे. युद्ध आणि अंतराळात सॅटेलाईट पाठविण्यासाठी देखील. अंतराळात वेगाने आणि कमी खर्चात सॅटेलाईट पाठविता येणार आहेत. याशिवाय भारताचे ब्राम्होस-२ हे खतरनाक मिसाईल बनविण्यासही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. सध्या डीआरडीओ आणि रशियाची एजन्सी हे ब्राम्होस-२ बनवित आहेत. 



या मिसाईलचा वेग एवढा असतो की, जर हे मिसाईल भारतातून डागण्यात आले तर जगातील कोणत्याही देशाला तासाभरात उद्ध्वस्त करता येणार आहे. सामान्य मिसाईल बॅलेस्टिक ट्रॅजेक्टरीचे पालन करतात. यामुळे त्यांना आरामात ट्रॅक करता येते. यामुळे दुष्मनालाही त्या मिसाईलवर वार करण्याची संधी मिळते. तर हायपरसोनिक मिसाईल कोणत्याही ठरवून दिलेल्या मार्गाने जात नाही. ते अमेरिकेच्या दिशेने जाऊन थेट चीनवरही आदळू शकते. वेग एवढा असणार की एअर डिफेन्स सिस्टिमही यासमोर फेल ठरणार आहे. 



 

रशियाकडे सर्वात खतरनाक मिसाईल
हायपरसोनिक मिसाईल आवाजाच्या वेगापेक्षा (1235 किमी) कमीत कमी ५ पटींनी जास्त वेगाने जाऊ शकते. म्हणजेच 6174 प्रति तास वेग. या मिसाईलमध्ये क्रूझ आणि बॅलिस्टिक मिसाईल या दोन्हींचे गुण आहेत. हे मिसाईल लाँच झाल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाणार आहे. त्यानंतर तेथून अंतर कापत लक्ष्याकडे झेपावणार आहे. यामुळे या मिसाईलला रोखणे कठीण असणार आहे. वेगही प्रचंड असल्याने सध्याचे रडार या मिसाईलला शोधण्यात कुचकामी ठरणार आहेत. या मिसाईलच्या वेगामुळे अमेरिकेसह चीनलाही धडकी भरली आहे. अमेरिकेच्या पेटागॉननुसार ते हाय़परसोनिक मिसाईलवर काम करत आहेत. तर चीनने हायपरसोनिक हत्याराचे 2014 मध्येच टेस्टिंग केले आहे. या मिसाईलची धक्कादायक बाब म्हणजे हे मिसाईल तब्बल दोन अब्ज किलो अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. यामुळे एखादा मोठा देश काही क्षणांत बेचिराख होऊ शकतो. या मिसाईलच्या टप्प्यात अमेरिकाही येते. 2018 मध्ये या मिसाईलची टेस्टिंग करण्यात आली होती. तेव्हा 6000 किमीवरील लक्ष्यभेद करण्यात आला होता. 

महत्वाच्या बातम्या...

Video: 100 लष्करी वाहने, 1000 सैनिक; घुसखोरीत हरले म्हणून चीनचा सीमेवर युद्धसराव

Tata Harrier चे नवे व्हेरिअंट लाँच; MG Hector, क्रेटाला देणार थेट टक्कर

"7 रुपयांत 100 किमी"! हैदराबादच्या कंपनीने अ‍ॅटम बॉम्बच फोडला; मोटरसायकलची किंमत 50 हजार

Web Title: Video: success for DRDO; Hypersonic missile launch who destroy target in 1 hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.