VIDEO - तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सिद्ध केले बहुमत
By Admin | Published: February 18, 2017 11:50 AM2017-02-18T11:50:29+5:302017-02-18T16:02:57+5:30
तामिळनाडूचे मुख्यमंत्री इदापादी के पालानीस्वामी यांनी अखेर 122 आमदारांच्या पाठिंब्यासह तामिळनाडू विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला.
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 18 - तामिळनाडूचे मुख्यमंत्री इदापादी के पालानीस्वामी यांनी अखेर 122 आमदारांच्या पाठिंब्यासह तामिळनाडू विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. द्रमुकच्या आमदारांनी तोडफोड आणि गदारोळ केल्यामुळे त्यांना सभागृहाबाहेर काढल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला.विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अण्णाद्रमुकचे आणि पनीरसेल्वम गटाचे आमदार उपस्थित होते. द्रमुकचे 88 आणि आययूएमएलच्या एक असे मिळून 89 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले होते.
तामिळनाडू विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्याच्या दरम्यान शनिवारी एकच गदारोळ झाला. गुप्त मतदान घेण्याची द्रमुक आमदारांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळल्याने संतापलेल्या द्रमुक आमदारांनी खुर्च्यांची मोडतोड केली. विधानसभा अध्यक्षांसमोरच्या टेबलही तोडले. आमदारांच्या या हिंसक वर्तनामुळे तामिळनाडू विधानसभा दुपारी 1 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
द्रमुक, काँग्रेसच्या आमदारांनी पनीरसेल्वम गटाला पाठिंबा दिला असून, त्यांनी केलेली गुप्तमतदानाची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिलेली असताना मुख्यमंत्री इदापादी के पलानीस्वामी यांनी आजच बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
235 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेमध्ये शशिकला गटाच्या पलानीस्वामी यांनी 124 आमदारांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. राज्यपालांनी 15 दिवसांची मुदत दिलेली असताना बहुमत सिद्ध करण्याची इतकी घाई का ? असा सवाल द्रमुक नेते एम.के.स्टालिन यांनी विचारला.
#WATCH DMK MLAs scuffle with TN Assembly speaker, protesting DMK MLA Ku Ka Selvam sat on speaker chair #floortest (Jaya TV) pic.twitter.com/CkMQY9FfQx
— ANI (@ANI_news) February 18, 2017