Video : आग लागताच तीन मजली इमारत जमीनदोस्त; अग्नीशमन दलाचे 100 जवान थोडक्यात वाचले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 07:26 PM2023-03-01T19:26:24+5:302023-03-01T19:27:14+5:30
राजधानी दिल्लीत घडलेल्या या भीषण दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. पाहा धक्कादायक Video...
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील रोशनारा रोडवर असलेल्या कारखान्यात आज भीषण आग लागली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक अख्खी इमारत कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी अचानक इमारत कोसळली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वजण गोंधळले. यावेळी अग्निशमन दलाचे सुमारे 100 जवान थोडक्यात बचावले. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
This is scary !
— Zafar Abbas (@zafarabbaszaidi) March 1, 2023
A building came crashing down after it caught fire at Roshan Ara road in North Delhi.
This is what makes the job of Fire fighters so risky. pic.twitter.com/xTzbNLf5a1
इमारत कोसळल्यानंतर धुळीचे लोट परिसरात पसरले. यावेळी समोरील इमारतीवरुन एका व्यक्तीने ही घटना मोबाईलमध्ये शूट केली. स्थानिकांनी सांगिल्यानुसार, ही इमारत खूप जुनी होती आणि यात जयपूर गोल्डन ट्रान्सपोर्टचे गोदाम होते. या इमारतीत मोठ्या प्रमाणात केमिकल ठेवण्यात आले होते. इमारत कोसळल्याने इतर घरांना भेगा पडल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत.