व्हिडिओ - दिल्लीत अपघाताचा थरार, 5 मिनिटांमध्ये तरुणाने तिघांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2016 11:44 AM2016-06-14T11:44:42+5:302016-06-14T12:15:44+5:30

मद्यप्राशन करुन गाडी चालवणा-या तरुणाने फक्त 5 मिनिटांत तिघांना चिरडलं असून यातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे

Video - The tragedy of the accident in Delhi, in 5 minutes the youth threw the three | व्हिडिओ - दिल्लीत अपघाताचा थरार, 5 मिनिटांमध्ये तरुणाने तिघांना चिरडले

व्हिडिओ - दिल्लीत अपघाताचा थरार, 5 मिनिटांमध्ये तरुणाने तिघांना चिरडले

Next
ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 14 - राजधानी दिल्ली सोमवारी हिट अॅण्ड रनने हादरली. दारुच्या नशेत गाडी चालवणा-या तरुणाने फक्त 5 मिनिटांत तिघांना चिरडलं असून यातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. रिशभ रावत असं या तरुणाचं नाव आहे. मित्राच्या घरी पार्टी करुन झाल्यानंतर रिशभ रावत घरी जात असताना ही घटना घडली. पोलिसांनी रिशभला अटक केली आहे.  
 
रिशभ रावत बीबीएचा विद्यार्थी आहे. शिवनगर परिसरात तो मित्राच्या घरी पार्टीसाठी गेला होता. तेथून फक्त 3 किमीच्या अंतरावर जनकपूरीमध्ये तो राहतो. मात्र फक्त पाच मिनिटांच्या प्रवासात त्याने तिघांना चिरडलं. अपघात इतके भयानक होते की गाडीच्या काचाही फुटल्या आहेत. मात्र तरीही रिशभ गाडी न थांबवता चालवतच होता. अखेर पोलीस कॉन्स्टेबलने त्याला रोखल्यानंतर त्याने गाडी थांबवली. मात्र आपण काहीच न केल्याचा अविर्भावात त्याने पोलिसाकडेच सिगारेट लायटर मागितले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर माझ्या वडिलांकडून पैसे घेऊन पिडीतांना नुकसानभरपाई द्या असंही बोलला.
 
सकाळी 6 वाजता रिशभने मित्राचं घर सोडलं आणि अपघातांना सुरुवात झाली. तिहार कारागृहाजवळ रिशभने यु-टर्न घेतला आणि वेगाने गाडी चालवायला सुरुवात केली. कामेश्वर प्रसाद गेट नंबर 4 जवळ पोहोचले होते जेव्हा रिभशने त्यांना उडवलं. गाडीचा वेग इतका जोरात होता की कामेश्वर प्रसाद सात ते आठ फूट लांब फेकले गेले. त्यांच्यासोबत चालत असलेल्या व्यक्तीला काही कळायच्या आत हा अपघात झाला होता. कामेश्वर प्रसाद बाजूला असलेल्या झाडात जाऊन पडले. भिंतीवर आपटल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 

अपघातानंतर लोक जमलेले असतानादेखील रिशभने गाडीचा वेग कमी केला नाही. जमलेल्या लोकांनी गस्त घालणा-या कॉन्स्टेबल परवेश यांना अपघाताची माहिती दिली. मात्र सूचना देऊनही रिशभने गाडी थांबवली नाही. जनकपुरीमध्ये पोहोचल्यावर रिशभने गाडी साफ करत उभ्या असलेल्या संतोषला धडक दिली. गाडी संतोषच्या पायावरुन गेल्याने त्याला गंभीर जखम झाली आहे. मात्र यानंतरही रिशभने गाडी थांबवण्याची तसदी घेतली नाही. 
पुढे जाऊन त्याने वळण घेत चुकीच्या दिशेला गाडी घातली आणि 67 वर्षीय अश्विनी आनंद यांना धडक दिली. अश्विनी आनंद यांचाही या अपघातात मृत्यू झाला. अखेर पोलीस कॉन्स्टेबल परवेशने ओव्हरटेक करत गाडी रोखली. 
 
(व्हिडिओ - दिल्लीत कारने मुलीला उडवलं, सुदैवाने बचावली)
 
पोलिसांना गाडीमध्ये दारुच्या बाटल्या मिळाल्या आहेत. पोलिसांनी जेव्हा रिशभला पोलीस ठाण्यात चलण्यास सांगितलं तेव्हा त्याने नकार देत माझ्या वडिलांकडून नुकसानभरपाई घ्या असं उलट उत्तर दिलं. रिशभ रावतने क्षमतेपेक्षा जास्त दारु प्यायल्याचं तपासणीत समोर आलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून तिहार कारागृहात ठेवलं आहे. 
रिशभ रावतच्या वडिलांचं जनकपुरीमध्ये हार्डवेअरचं दुकान आहे. डिसेंबरमध्ये त्यांनी रिशभला गाडी गिफ्ट म्हणून दिली होती. पोलिसांचं विशेष पथक या घटनेची तपासणी करत असून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करणार असल्याची माहिती डीसीपी पुष्पेंदर कुमार यांनी दिली आहे. अश्विनी आनंद आणि प्रसाद यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली करण्यात आला आहे. 
 

Web Title: Video - The tragedy of the accident in Delhi, in 5 minutes the youth threw the three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.