Video - हृदयद्रावक! लग्नात विपरित घडलं, नवरदेवाच्या मामाला नाचताना मृत्यूने गाठलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:32 AM2024-04-24T11:32:14+5:302024-04-24T11:37:19+5:30
भाच्याच्या लग्नात डोक्यावर मडकं घेऊन नाचत असताना मामा अचानक खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भाच्याच्या लग्नात डोक्यावर मडकं घेऊन नाचत असताना मामा अचानक खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मामाचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेनंतर नातेवाईकांना मोठा धक्का बसला असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झुंझुनू जिल्ह्यातील नवलगड भागातील एका गावात ही घटना घडली. येथे लग्नसोहळ्यातील आनंदाचे शोकाकुलात वातावरणात रूपांतर झाले. कमलेश असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते 20 एप्रिल रोजी आपल्या भाच्याच्या लग्नासाठी आपल्या कुटुंबीयांसह आले होते. लग्नामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं.
नवलगढ़ : भांजे की शादी में जमकर डांस कर रहा था मामा, शादी का जश्न बदला मातम में. कार्डियक अरेस्ट की वजह से मौत. pic.twitter.com/5R6dxFPtxD
— Arvind Sharma (@sarviind) April 24, 2024
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कमलेश हे डोक्यावर मडकं ठेवून मस्त मजेत सर्वांसोबत नाचत होते. पण नाचता नाचता अचानक ते खाली कोसळले. यानंतर कमलेश यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
डॉक्टरांनी कार्डियक अरेस्टने मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. मामाच्या आकस्मित मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. मामाच्या अंत्यसंस्कारानंतर भाच्याचा विवाह सोहळा पार पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.