VIDEO : हिंसक आंदोलकांचा हल्ला, जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्लावरून मारल्या उड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 12:28 AM2021-01-27T00:28:05+5:302021-01-27T00:28:54+5:30
violence in tractor rally : लाल किल्ल्यात हिंसक आंदोलकांनी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतशेतकरी आंदोलकांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले. दिल्लीती विविध ठिकाणी शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापटी झाल्या. दरम्यान, देशाच्या राजधानीचा मानबिंदू असलेल्या लाल किल्लाही हिंसक आंदोलनामधून सुटला नाही. दरम्यान, लाल किल्ल्यात हिंसक आंदोलकांनी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे.
दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीदरम्यान शेतकऱ्यांचा एक मोठा हिंसक जमाव लाल किल्ल्यावर चाल करून आला. या जमावाने लाल किल्ल्यातील महत्त्वाच्या जागा ताब्यात घेऊन तिथे धार्मिक तसेच इतर झेंडे फडकवले. तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवरही आंदोलकांनी हल्ला केला. यातील एक व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लाल किल्ल्यावर आंदोलक जमाव पोलिसांवर हल्ला करताना दिसत असून, पोलीस जीव वाचवण्यासाठी लाल किल्ल्याच्या भिंतीवरून उड्या मारताना दिसत आहेत.
#WATCH | Delhi: Protestors attacked Police at Red Fort, earlier today. #FarmersProtestpic.twitter.com/LRut8z5KSC
— ANI (@ANI) January 26, 2021
दरम्यान, आज दिल्लीत झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये दंग्यामध्ये सुमारे ८३ पोलीस जखमी झाले आहेत. यापैकी अनेक पोलिसांना गंभीर दुखापती झाल्या असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांचे जॉईंट कमिश्नर आलोक कुमार यांनी सांगितले की, अॅडिशनल (ईस्ट) डीसीपी मंजीत यांच्यावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा दलांनी प्रसंगावधान राखून त्यांना वाचवले. अन्यथा मोठा अपघात झाला असता. याशिवाय अन्य एका पोलीस अधिकाऱ्याला दुखापत झाली आहे. तसेच अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
यापूर्वी आंदोलनकर्ते शेतकरी आयटीओमध्ये पोहोचले आणि लुटियन्स भागात पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला.