कॉलर पकडली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 01:22 PM2024-10-09T13:22:46+5:302024-10-09T13:25:29+5:30
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, भाजपा आमदार योगेश वर्मा यांना थप्पड मारल्याची घटना समोर आली.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेच्या प्रबंध समितीच्या निवडणुकीवेळी मोठा वाद सुरू झाला. या वादात भाजपा आमदार योगेश वर्मा यांना थप्पड मारल्याची मारल्याचे समोर आले आहे. बुधवारी बार असोसिएशनचे अध्यक्ष अवधेश सिंह यांनी भाजप आमदार योगेश वर्मा यांना थप्पड मारली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अवधेश यांनी थप्पड मारल्यानंतर आमदार समर्थकांनी अवधेश यांना मारहाण केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
भाजपचे लखीमपूर युनिटचे जिल्हाध्यक्ष सुनील सिंह आणि योगेश वर्मा यांचे पत्र व्हायरल झाले असून त्यात त्यांनी निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, निवडणूक पुढे ढकलण्यात येणार नसल्याचे एडीएम संजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी कोणीतरी मतदार यादी फाडल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. यावरुन हा वाद झाला.
बँकेच्या या निवडणुकीसाठी १४ ऑक्टोंबरपासून प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या बँकेसाठी १२ हजार सभासद मतदान करतात. आजपासून या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल. १० ऑक्टोंबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. ११ तारखेला अर्जाची छाननी होणार असून चिन्हही मिळणार आहेत.
लखीमपुर में अर्बन कॉपरेटिव बैंक चुनाव बना जंग का अखाड़ा,
— Vivek Rai (@vivekraijourno) October 9, 2024
सदर विधायक योगेश वर्मा की हुई पिटाई। pic.twitter.com/T6Wsw217xZ
या निवडणुकीची प्रक्रिया 14 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही होणार होती. माहितीनुसार, मतदान करणारे 12 हजार भागधारक आहेत. बुधवार म्हणजेच आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार होती आणि 10 तारखेला अर्ज माघारी घ्यायचे होते, 11 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार होते. दुसरीकडे आमदार योगेश वर्मा यांनी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला आहे.