मोदींच्या रावणरुपी पुतळादहनाचा व्हिडिओ व्हायरल, चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2016 06:42 PM2016-10-13T18:42:38+5:302016-10-13T18:42:38+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा झाळल्याने हा वाद उफळला जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी विद्यापीठाचे उप कुलसचिव एम. जगदीश यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत

Video viral, judicial order of Modi's statutory statue | मोदींच्या रावणरुपी पुतळादहनाचा व्हिडिओ व्हायरल, चौकशीचे आदेश

मोदींच्या रावणरुपी पुतळादहनाचा व्हिडिओ व्हायरल, चौकशीचे आदेश

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 :  जेएनयू विद्यापीठ पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडले आहे. दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याच्या जागी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा झाळल्याने हा वाद उफळला जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी विद्यापीठाचे उप कुलसचिव एम. जगदीश यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
काँग्रेसच्या स्टूडेंट विंग एनएसयूआयच्या प्रतिनिधींनी जेएनयूमध्ये दसऱ्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच अमित शाह, बाबा रामदेव, साध्वी प्रज्ञा, योगी आदित्यनाथ, आसाराम, नथुराम गोडसे यांचे देखील पुतळे जाळले. यूनिवर्सिटीचे वाईस चान्सलर एम जगदेश यांचा देखील पुतळा जाळण्यात आला. पुतळा जाळतांनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
एएनआयच्या वृत्तानुसार गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना जेएनयू प्रकरणावर रिपोर्ट मागितली आहे. कुलपतींना देखील याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगीतलं आहे.  
 
 
एनएसयूआयने देखील त्यांच्या जेएनयू विंगविरोधात कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत. या पुतळा जाळण्याच्या घटनेत जे जे विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांना याबाबत विचारणा करणारी नोटीस देण्यात आली आहे. कारण पुतळा जाळणं हे जेएनयूच्या आचारसहितेच्या विरोधात आहे.
 

Web Title: Video viral, judicial order of Modi's statutory statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.