VIDEO - विदेशी पक्षांचे राजस्थानात 'हिवाळी अधिवेशन'

By Admin | Published: November 12, 2016 05:02 PM2016-11-12T17:02:08+5:302016-11-12T17:02:08+5:30

अझहर शेख,  ऑनलाइन लोकमत खीचन, दि. १२ -  राजस्थान मधील जोधपूर जिल्ह्याचे खीचन गाव सध्या मंगोलिया, आफ्रिकाच्या डॉमिसिल क्रेन ...

VIDEO - 'Winter Session' for foreign parties in Rajasthan | VIDEO - विदेशी पक्षांचे राजस्थानात 'हिवाळी अधिवेशन'

VIDEO - विदेशी पक्षांचे राजस्थानात 'हिवाळी अधिवेशन'

Next
अझहर शेख,  ऑनलाइन लोकमत
खीचन, दि. १२ -  राजस्थान मधील जोधपूर जिल्ह्याचे खीचन गाव सध्या मंगोलिया, आफ्रिकाच्या डॉमिसिल क्रेन ( कर्कोचे) जातीच्या स्थलांतरित हजारो पक्ष्यानी गजबजले आहे.  
मागील पाच दिवसांपासून खीचनमध्य या विदेशी पाहुण्यांचे  हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. वाळवंटात कडाक्याच्या थंडीत भरलेले हे अधिवेशन पक्षी प्रेमीं चे आकर्षण बनले आहे.  पाच हजार लोकसंख्या असलेल्या खीचनमध्ये गांवकरीसोबत या पाहुण्या पक्षांनी अनोखे नाते जोपासले आहे. भरवस्तीत हजारोंच्या संख्येने हे पक्षी सकाळी 8 ते 10 या वेळेत निर्धास्त पणे भूक भगवितात. त्यांनतर गावातून या पक्षांचे थवे वेशिजवळील तलावाच्या काठावर उतरतात आणि तहान भगवितात.
 
दरम्यान, दिवसभर तलावाच्या काठावर या राखाडी रंगाच्या स्थलांतरित कर्कोच्यांची जत्रा भरते. सूर्यास्ताला हे पक्षी भरारी घेतात आणि रात्रीचा मुक्काम तीस किलोमीटर अंतरावरील मिठाच्या करखान्याच्या आसपास थांबतात .  खीचनच्या मातीमधी ल लहान खारट खडे हे या पक्षांचं आवडते खाद्य, गावकरी   ज्वारी, बाजरी, टाकतात.शेकडो किलो धान्य दररोज गावकरी उपलब्ध करून देतात.
 
सेवारामच्या सेवेचे दीड तप
पक्षीप्रेम आणि खीचनमध्ये येणाऱ्या मंगोलिया च्या पाहुन्यायांच्या होनाऱ्या दुर्घटना बघून सेवाराम मालिक चे हृदय हेलावले.  अन निश्चय केला  की मंगोलियाहुन लाखो किलोमीटर चा प्रवास करून येणारया या पाहुण्या पक्षांचे संवर्धन करायचे. 2009 सालात सेवाराम ने येथे आलेल्या पक्षांना धान्य देणे, जखमी पक्षांचे औषधोपाचार करणे वनविभाग जोधपूर व फलोदी तालुका वन संरक्षक विभागाला माहिती देणे आदी कार्य सुरु केले ते आजतागायत सूरु आहे. खीचन ला  या पाहुण्यांनी नवी ओळख मिळून दिली आहे,  आज देशाच्या कानाकोपर्यासह विदेशातून ही पर्यटक मोठया संख्येने हजेरी लावत  आहेत. यामुळे  येथील ग्रामपंचायत ला महसूळ मिळु लागला  आहे. मात्र राजस्थान सरकार व जोधपूरर वनविभाग ने याबाबत गंभीर विचार केलेला नाहि आणि हे पर्यटन स्थळ विकासापासून कोसो दूर आहे. 
 
https://www.dailymotion.com/video/x844hox

Web Title: VIDEO - 'Winter Session' for foreign parties in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.