Video: सीएएविरोधातील मंचावरुन तरुणीचा 'पाकिस्तान झिंदाबाद' नारा; औवेसींनी काय केलं पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 09:43 PM2020-02-20T21:43:46+5:302020-02-20T21:47:30+5:30
Asaduddin Owaisi: पोलिसांनी तातडीने या मुलीला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. त्याचवेळी औवेसी यांनी स्टेजवरूनच या घटनेचा निषेध केला.
बंगळुरु - एमआयएमचे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरुन वादंग सुरु असतानाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांच्या बंगळुरुच्या सभेत गदारोळाची स्थिती निर्माण झाली. बेंगळुरूमधील सीएएविरोधी मंचावरुन एका तरुणीने माईकवरुन 'पाकिस्तान झिंदाबाद' अशी घोषणा देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे औवेसी आणि संयोजकांना मोठा धक्का बसला.
पोलिसांनी तातडीने या मुलीला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. त्याचवेळी औवेसी यांनी स्टेजवरूनच या घटनेचा निषेध केला. औवेसी बेंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे सीएएविरोधात रॅलीत सहभागी झाले होते. या वेळी तेथे ही मुलगी उपस्थित होती, ही विद्यार्थी नेता असल्याचं म्हटले जातंय. कार्यक्रमाच्या मध्यभागी ती तरुणी स्टेजवर पोहोचली आणि माइकवर पाकिस्तान झिंदाबाद घोषणा द्यायला सुरुवात केली यावेळी औवेसींनी स्वत: या तरुणीला रोखण्यास सरसावले त्यानंतर तिने 'हिंदुस्तान झिंदाबाद' अशी घोषणाबाजी सुरू केली.
ती मुलगी माइकवर बोलत होती, 'हिंदुस्तान झिंदाबाद आणि पाकिस्तान झिंदाबाद यात फरक आहे' पण ती बोलण्यापूर्वी तिथल्या आयोजकांनी तिच्याकडून माइक हिसकायचा प्रयत्न केला. अखेर या तरुणीला पोलिसांनी पकडून ताब्यात घेतलं. या तरुणीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच देशद्रोहाचा गुन्हादेखील दाखल होऊ शकतो.
Case registered under Sec124A (Offence of sedition) of the Indian Penal Code against Amulya, the woman who raised 'Pakistan zindabad' slogan at anti-CAA rally in Bengaluru today. Police to interrogate her. She will be produced before a court after her interrogation. https://t.co/SLjwmVQsBG
— ANI (@ANI) February 20, 2020
संपूर्ण प्रकार पाहून औवेसी स्तब्ध झाले आणि त्यांनी त्वरित त्यांनी स्पष्टीकरण दिले. औवेसी म्हणाले, 'ही सीएएविरोधी रॅली आहे. शत्रू देशाच्या बाजूने कोणत्याही घोषणेचे समर्थन केले जाणार नाही. आम्ही त्याचा निषेध करतो. हे खूप चुकीचे आहे. आमचा या तरुणीशी काही संबंध नाही भारत झिंदाबाद होता आणि झिंदाबाद राहील
Asadduduin Owaisi, AIMIM, in Bengaluru: I condemn this statement. The woman is not associated with us. Humare liye Bharat Zindabad tha, zindabad rahega. pic.twitter.com/DMe4Zvsc9L
— ANI (@ANI) February 20, 2020
वारिस पठाण यांनीही केलं होतं वादग्रस्त विधान
एआयएमआयएमचे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी काही दिवसांपूर्वी एका रॅलीत वादग्रस्त विधान केले होते. आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असं ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,' असं वादग्रस्त विधान वारिस पठाण यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत - संजय राऊत
कलम 370 हटवल्यानंतर कलम 371बाबत अमित शाहांचं मोठं विधान
मनसेचा वारिस पठाणांना गंभीर इशारा; 'आम्ही' 'तुम्ही' असले भेद मान्य नाहीत. पण...
VIDEO: आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी पडू; एमआयएम नेत्याची थेट धमकी
मशीद तोडणाऱ्यांना पुरस्कार, असदुद्दीन ओवेसींचा केंद्र सरकारवर निशाणा
कीर्तनातील 'त्या' वादग्रस्त विधानावरुन इंदोरीकर महाराजांनी केला मोठा खुलासा; कारवाई टळली