VIDEO: महिला ट्रेनखाली येण्यापासून थोडक्यात बचावली
By admin | Published: September 1, 2016 06:38 PM2016-09-01T18:38:36+5:302016-09-01T18:38:36+5:30
जाहिदा असं नाव असलेली ही महिला समोरच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ट्रॅकवर उतरली होती. इतक्यात मागून येणारी मालगाडी पाहून तिचा थरकापच उडाला
Next
- ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 1 - पादचारी पुलाचा वापर न करता रेल्वे ट्रॅकवर उतरुन क्रॉसिंग करुन आपला जीव धोक्यात घालणारी लोक प्रत्येक रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळतात. कधी वेळ वाचवण्यासाठी तर कधी शॉर्टकट म्हणून ट्रॅकवरुनच दुस-या प्लॅटफॉर्मवर प्रवास केला जातो. अशाच प्रकारे ट्रॅकवर उतरलेली महिला ट्रेनखाली येण्यापासून थोडक्यात बचावली. आरपीएफ जवानाने वेळीच महिलेला मागे खेचल्याने जीव वाचला. दाहोद रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली. अंगावर काटा आणणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
जाहिदा असं नाव असलेली ही महिला समोरच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ट्रॅकवर उतरली होती. इतक्यात मागून येणारी मालगाडी पाहून तिचा थरकापच उडाला. पुन्हा मागे येण्याचा तिचा प्रयत्न सुरु होता, पण प्लॅटफॉर्मची उंची जास्त असल्याने आपण आता ट्रेनखाली येणार असं वाटत असतानाच तिथे उपस्थित असलेल्या एका आरपीएफ जवानाने संपुर्ण ताकदीने महिलेला वर ओढलं. फक्त एका सेकंदाचा फरत होता नाहीतर महिलेने जीव गमावला असता. जाहिदा प्लॅटफॉर्मवर आल्या तेव्हा ट्रेन फक्त एक हात दूर होता. जाहिदाचा जीव वाचल्यानंतर लोकांनी आरपीएफ जवानाचं कौतुक केलं.
#WATCH Woman trying to cross a railway track narrowly escapes speeding train, in Dahod (Gujarat) (31.8.16) pic.twitter.com/xdbWBtMGdQ
— ANI (@ANI_news) September 1, 2016